शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फेलोशीपसाठी राष्ट्रीय मानांकन शिक्षण संस्थेची अट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 08:24 IST

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती(फेलोशीप)साठी असलेली राष्ट्रीय मानांकन शिक्षण संस्थेची अट रद्द करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची संख्याही २०० वर देशातील कोणत्याही विद्यापीठातील पात्र विद्यार्थ्यास लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क

आनंद डेकाटे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती(फेलोशीप)साठी असलेली राष्ट्रीय मानांकन शिक्षण संस्थेची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशातील कोणत्याही विद्यापीठातील पात्र विद्यार्थी या फेलोशीपचा लाभ घेऊ शकेल. इतकेच नव्हे तर बार्टीने विद्यार्थ्यांची संख्याही दरवर्षी २०० इतकी वाढविली आहे.

पीएचडी व एमफील करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती(फेलोशीप)ही योजना २०१३ पासून बार्टीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर तो अर्जदार राष्ट्रीय मानांकित शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असावा ही जाचक अट टाकण्यात आली. राज्यात अशा मानांकित संस्थांमध्ये समावेश होणारी विद्यापीठे मोजकीच आहे. त्यात एकही पशुवैद्यक व कृषी विद्यापीठ सुद्धा नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ पाहिजे तसा विद्यार्थ्यांना मिळू शकत नव्हता. या योजनेची मागील सात वर्षांतील एकूण लाभार्थी संख्या केवळ १०५ इतकी होती. गेल्या दोन वर्षात तर जाहिरातच आली नाही. चालू वर्षात देखील यात फक्त एकाच लाभार्थ्याला लाभ मिळाला आहे. त्यामुळे या योजनेची जी अट घातली होती ती मुळातच विद्यार्थ्यांसाठी जाचक बनली होती. परिणामी बार्टीच्या मूळ उद्देशाला हरताळ

फासला जात होता. अनेक शिक्षण व सामाजिक संघटनांनी याविरोधात आवाजही उचलला. अखेर बार्टीने ही जाचक अट रद्द केली

आंदोलनाला यश

स्टुडंट हेल्पींग हँडतर्फे आम्ही हा विषय लावून धरला होता. बार्टीचा उद्देश चांगला होता. परंतु राष्ट्रीय मानांकन शिक्षण संस्थेच्या अटीमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना या फेलोशीपचा लाभ घेता येत नव्हता. बार्टीने अखेर ही अट रद्द केली. यासंदर्भात २०१९ व २०२० या दोन्ही वर्षांच्या जागा वाढवून प्रत्येकी २०० करण्यात आल्या आहेत. यामुळे आंदोलनाला यश आले.

कुलदीप आंबेकर

अध्यक्ष, स्टुडंट हेल्पींग हँड

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र