शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मनपा क्रीडा अधिकारी व निरीक्षकाचे अधिकार काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:47 IST

गेल्या बजेटमध्ये पर्याप्त निधीची तरतूद केल्यानंतरही मनपाच्या क्रीडा विभागाने रबर मॅटची खरेदी केली नाही. त्यामुळे निधी परत गेला. विभागाने खो-खो, कबड्डी, कुस्ती स्पर्धेसाठी रबर मॅट भाड्याने घेतली आणि त्याकरिता २७ लाख रुपये खर्च केले. त्यानंतर आता कबड्डीचे दोन रबर मॅट आणि कुस्तीकरिता एक मॅट खरेदीचा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रकरणी स्थायी समिती अध्यक्षांनी क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल आणि क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीदरम्यान त्यांच्याकडील कार्यभार काढून घेतला.

ठळक मुद्देरबर मॅटचा निधी परत : स्थायी समितीचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या बजेटमध्ये पर्याप्त निधीची तरतूद केल्यानंतरही मनपाच्या क्रीडा विभागाने रबर मॅटची खरेदी केली नाही. त्यामुळे निधी परत गेला. विभागाने खो-खो, कबड्डी, कुस्ती स्पर्धेसाठी रबर मॅट भाड्याने घेतली आणि त्याकरिता २७ लाख रुपये खर्च केले. त्यानंतर आता कबड्डीचे दोन रबर मॅट आणि कुस्तीकरिता एक मॅट खरेदीचा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रकरणी स्थायी समिती अध्यक्षांनी क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल आणि क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीदरम्यान त्यांच्याकडील कार्यभार काढून घेतला.राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी मनपाला भाड्याने रबर मॅट घ्यावे लागतात. या मॅटविना स्पर्धा शक्य नाही. यामुळेच वर्ष २०१८-१९ च्या बजेटमध्ये ७० लाख रुपयांची तरतूद स्थायी समितीने केली होती. संबंधित निधीतून कुस्तीकरिता दोन आणि खो-खोकरिता चार रबर मॅट खरेदीचे प्रस्ताव होते. पण क्रीडा अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करून सादर केला नाही. याउलट खो-खो, कबड्डीच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मनपाने २७ लाख रुपये खर्च करून रबर मॅट भाड्याने घेतले. त्यामुळे मनपाला आर्थिक तोटा झाला.शुक्रवारी वर्ष २०१९-२० च्या बजेटमध्ये देण्यात आलेल्या निधीतून दोन कबड्डी मॅट आणि एक कुस्तीकरिता मॅट खरेदीची निविदा १५.६२ लाख रुपयांत वाट्स स्पोर्ट्स मेरठला देण्यात आल्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला. या प्रस्तावात मॅटची संख्या स्पर्धा पाहता दुप्पट करण्याचा विषय सादर करण्यात आला. बैठकीत क्रीडा अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर स्थायी समितीने प्रश्न उपस्थित करून चौकशीचे आदेश दिले.वित्त विभागाकडे परत केला प्रस्तावजानेवारीमध्ये कंत्राटदारांच्या थकीत बिलाचे देय राज्य शासनातर्फे मनपाला मिळालेल्या निधीतून करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने वित्त विभागाकडे परत पाठविला. संबंधित १५० कोटी रुपयांच्या निधीतून ९० कोटी रुपयांचे देय कंत्राटदारांच्या बिलासाठी करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाने दिला होता. पण वित्त अधिकारी नितीन कापडणीस परत जाताच संबंधित प्रस्ताव थांबविण्यात आला. त्यामुळे आता कंत्राटदारांना संबंधित निधातून बिलाचे देय होण्याची शक्यता नाही.अग्निशमन सेवाशुल्क वाढीस मंजूरीअग्निशमन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सेवाशुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. एनओसी शुल्कात ५० टक्के, विहिरीच्या सफाई शुल्कात शतप्रतिशत, अग्निसुरक्षा बंदोबस्त शुल्कात ५० टक्के, आकस्मिक पाणी पुरवठा शुल्कात शतप्रतिशत, बचाव कार्य शुल्कात प्रति किलो आधार, वॉटर रेस्क्यू शुल्क दुप्पट करण्यासह विविध विभागात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. आता शुल्क वाढीचा प्रस्ताव सभागृहाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका