लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने लकडगंज झोन अंतर्गत एचबी टाऊन चौक हनुमान मंदिर ते भवानी माता मंदिर ते भरतवाडा ते विजय नगर ते गुलमोहर नगर ते भरत नगर चौक पर्यंतच्या फूटपाथवरील २२ अतिक्रमण हटविले. लक्ष्मीनगर जून मध्ये आयटी पार्क फूटपाथवरील पाच अतिक्रमण हटविण्यात आले.
यात फळविक्रेते भाजीविक्रेते नारळ पाणी विक्रेते, चायनीज पदार्थ विक्रेते आदींचा समावेश होता.
ही कारवाई उपायुक्त महेश मोरोणे व प्रवर्तन विभागाचे संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.