शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

झाडे, वीज तारांना गुंतलेला नायलॉन मांजा काढा; हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 11:37 IST

Nagpur News संभावित दुर्घटना टाळण्यासाठी झाडे व वीज तारांना गुंतलेला नायलॉन मांजा काढून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिला.

ठळक मुद्देसामाजिक संस्थांची मदत घेण्यास सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संभावित दुर्घटना टाळण्यासाठी झाडे व वीज तारांना गुंतलेला नायलॉन मांजा काढून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिला. तसेच, याकरिता सामाजिक संस्था व नागरिकांना सोबत घेऊन मोहीम राबवावी आणि येत्या दोन आठवड्यात याचा अहवाल सादर करावा असेही महानगरपालिकेला सांगण्यात आले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाची विक्री व वापर थांबविण्यासाठी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. सध्या नायलॉन मांजाचा वापर बंद आहे. परंतु, संक्रांत काळात पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा वापरण्यात आला. पतंग कापल्या गेल्यानंतर झाडे, वीज खांब इत्यादी ठिकाणी अडकलेला मांजा अद्याप कायम आहे. त्या मांजामुळे पक्षी जखमी होत आहेत. तसेच, वीज तारांना गुंतलेला मांजा कधीही मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकतो. प्रकरणातील न्यायालय मित्र ऍड . देवेंद्र चव्हाण यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. परिणामी, न्यायालयाने सदर आदेश दिला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय