शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसात घरांचे अवैध बांधकाम हटवा : मनपा आयुक्तांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 01:35 IST

इमामवाडा वस्तीतील आयसोलेशन रुग्णालयाच्या उत्तरेकडील भिंतीला लागून असलेल्या १३ घरांचे अवैध बांधकाम येत्या दिन दिवसात हटवा, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. मनपा प्रशासनातर्फे संबंधित झोपडपट्टीवासीयांना बुधवारी याबाबतची नोटीसही बजावण्यात आली. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इमामवाडा वस्तीतील आयसोलेशन रुग्णालयाच्या उत्तरेकडील भिंतीला लागून असलेल्या १३ घरांचे अवैध बांधकाम येत्या दिन दिवसात हटवा, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. मनपा प्रशासनातर्फे संबंधित झोपडपट्टीवासीयांना बुधवारी याबाबतची नोटीसही बजावण्यात आली. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.मनपाच्या मते, प्रभाग क्र. १७-अ मधील आयसोलेशन रुग्णालयाजवळून वस्तीच्या आतमध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील जागेवर हे अतिक्रमण उभारण्यात आले आहे. ते नियमाच्या विरुद्ध आहे. नागरिकांनी ही अवैध घरे न पाडल्यास मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून अतिक्रमणधारी नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या १३ घरांमध्ये जवळपास ७० नागरिक राहत आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हातातला रोजगार हिरावला गेला. संचारबंदी काहीही शिथिल झाली असली तरी, हाताला काम मिळालेले नाही. अशा परिस्थितीत प्रशासनाने आपल्याला बेघर केले तर, मुलाबाळांना घेऊन जाणार कुठे, हा प्रश्न संबंधित नागरिकांना सतावतो आहे. कोरोनाची परिस्थिती आणि पावसाळा बघता प्रशासनाने आपल्याला घरे हटविण्यासाठी तीन महिन्याची मुदतवाढ द्यावी अथवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवक विजय चुटेले यांनी आयुक्तांकडे केली आहे.