शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

सत्तेत नाही असे समजून मोर्चे काढा

By admin | Updated: April 27, 2017 02:20 IST

शिवसेना सत्तेत आहे, असे समजू नका. लोकहिताच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या, मोर्चे काढा. नागरिकांसाठी लढा द्या.

उद्धव ठाकरे यांचा सल्ला : पदाधिकाऱ्यांनी घेतली मातोश्रीवर भेट नागपूर : शिवसेना सत्तेत आहे, असे समजू नका. लोकहिताच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या, मोर्चे काढा. नागरिकांसाठी लढा द्या. मोर्च काढले तर मी नाराज होणार नाही. पण मोर्चे काढले नाही तर मात्र मी नक्की नाराज होईल, असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्ध‘ ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला. खा. कृपाल तुमाने, माजी आ. आशिष जैस्वाल, माजी जि.प. सदस्य देवेंद्र गोडबोले, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, राजू हरणे, तापेश्वर वैद्य, नंदू कन्हेर, दिलीप माथनकर आदींनी बुधवारी दुपारी १ वाजता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार केली. जिल्हास्तरीय समित्यांमध्ये शिवसेनेला वाटा मिळालेला नाही. विशेष कार्यकारी अधिकारीही बनविण्यात आलेले नाही. आपण सत्तेत आहो की नाही, असे वाटू लागले आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. यावर उद्धव ठाकरे यांनी आपण सत्तेत नाही, असे समजून लोकहितासाठी आक्रमक होण्याचा सल्ला दिला. नागपूर ग्रामीणसाठी डॉ. दीपक सावंत हे संपर्क प्रमुख आहेत. पण ते मंत्री असल्यामुळे व्यस्त असतात. राज्यभरातील निवडणुका आटोपल्या आहेत. नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक बाकी आहे. त्यामुळे पूर्णवेळ संपर्कप्रमुख देण्यात यावा. तसेच आपण स्वत: नागपूर ग्रामीणमध्ये मौदा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांना करण्यात आली. (प्रतिनिधी)