शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गांधीबाग, मानेवाडात अतिक्रमण हटाओ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:09 IST

नागपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी गांधीबाग आणि मानेवाडा परिसरात फुटपाथवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. दिवसभराच्या मोहिमेत २ ट्रक सामान ...

नागपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी गांधीबाग आणि मानेवाडा परिसरात फुटपाथवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. दिवसभराच्या मोहिमेत २ ट्रक सामान जप्त करण्यात आले. दोन पथकांनी ही कारवाई केली.

पहिल्या पथकाने हनुमाननगर झोन अंतर्गत तुकडोजी पुतळा चौकापासून तर मानेवाडा चौक आणि बेसा चौकापर्यंतचे अतिक्रमण हटविले. या सोबतच शताब्दी चौकातही कारवाई करण्यात आली. येथून एक ट्रक भरून सामान जप्त केले.

दुसऱ्या पथकाने लकडगंज झोन कार्यालयामागील जय सीताराम अपार्टमेंटला लागूनच असलेल्या नवाज गॅरेजमधील वाहने हटविली. बडकस चौक ते रुईकर रोडपर्यंत फुटपाथवरील ३५ अतिक्रमणे हटविण्यात आली. गुरु गोविंदनामक कपडा दुकानाचे फुटपाथवर ठेवलेले तीन स्टॅच्यू जप्त करण्यात आले. यानंतर गांधीबाग बागेपासून तर नंगा पुतळा चौक आणि इतवारी पोस्ट ऑफिसपर्यंतच्या मार्गावरील दोन्ही बाजूला लागलेले फेरीवाल्यांचे हातठेले हटविण्यात आले. या कारवाईत एक ट्रक सामान जप्त करण्यात आले. उपायुक्त अशोक पाटील, निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात राहुल रोकडे, विशाल ढोले व पथकाने ही कारवाई केली.