शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्र शेगावच्या विकासापुढील मोठे अडथळे दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:13 IST

देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील मंदिराचा विस्तार व परिसर विकासापुढील काही मोठे अडथळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दूर केलेत. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विकासकामांना चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट : मातंगपुरा, खळवाडीची जमीन रिकामी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील मंदिराचा विस्तार व परिसर विकासापुढील काही मोठे अडथळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दूर केलेत. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विकासकामांना चालना मिळणार आहे.मातंगपुरा वस्तीची जमीन मंदिराला देण्यात आली आहे. येथे नागरिकांचे स्वत:च्या मालकीचे २२ भूखंड आहेत. त्यांना रहिवासी कॉम्प्लेक्समध्ये स्थानांतरित होण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु, त्यांनी असहमती दर्शविली. त्यामुळे न्यायालयाने हे भूखंड संपादित करण्यासाठी सात दिवसांत विशेष भूसंपादन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी व त्यानंतर विशेष भूसंपादन अधिकाºयाने २७ एप्रिलपर्यंत बाजारभावाच्या पाचपट मोबदल्याचा निवाडा जाहीर करावा असे निर्देश दिलेत. या वस्तीत १७ कुटुंबांचे अतिक्रमण आहे. त्यापैकी सहा कुटुंबांना म्हाडाच्या प्रकल्पात घरे देण्यात आली आहेत. उर्वरित ११ कुटुंबांनी दुकानांची मागणी केली आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना आठवडी बाजारात दुकाने बांधून देण्यास सांगितले आहे. तसेच, या कुटुंबांना सात दिवसांमध्ये जागा रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी कारवाईद्वारे जागा रिकामी करून संत गजानन महाराज संस्थानला जागेचा ताबा द्यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. मोबदला व दुकाने बांधण्यासाठी संस्थान पैसे देणार आहे. खळवाडी येथील १९ भूखंड मालकांना दुकाने बांधून देण्यात आली आहेत. संस्थानने प्रत्येक दुकानासाठी २२ लाख रुपये दिले आहेत. परंतु, भूखंड मालकांनी दुकाने स्वीकारली नाहीत. न्यायालयाने त्यांना जागा रिकामी करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय गाडगेबाबा चौक ते महात्मा गांधी चौकापर्यंतच्या रोड रुंदीकरणाचा प्रश्नही सोडविण्यात आला आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अ‍ॅड. फिरदोस मिर्झा प्रकरणात न्यायालय मित्र असून संस्थानतर्फे अ‍ॅड. अरुण पाटील तर, प्रभावित नागरिकांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयShegaonशेगाव