शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रात्रकालीन शाळांतील तदर्थ शिक्षकांना दिलासा

By admin | Updated: June 17, 2017 02:19 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रात्रकालीन शाळांतील तदर्थ

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रात्रकालीन शाळांतील तदर्थ शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला. त्यामुळे शहरातील ३५ शिक्षकांना दिलासा मिळाला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना रात्रकालीन शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात तदर्थ शिक्षक म्हणून नियुक्त करण्याची ‘महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट आॅफ प्रायव्हेट स्कूल रुल्स-१९८१’मध्ये तरतूद आहे. राज्य शासनाने १७ मे २०१७ रोजी अध्यादेश काढून अशा नियुक्त्या रद्द केल्या आहेत. याविरुद्ध पुंडलिक चौधरी व अन्य ३४ शिक्षकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. नियुक्त्या रद्द करण्याच्या वादग्रस्त अध्यादेशामध्ये शासनाने काही अव्यवहार्य बाबी नमूद केल्या आहेत. राज्यात शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यामुळे अनेक शाळांतील शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्या शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी रात्रकालीन शाळांमध्ये तदर्थ शिक्षकाऐवजी अतिरिक्त शिक्षक नेमण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे, असे शासनाचे स्पष्टीकरण आहे. यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. रात्रकालीन शाळांना शिक्षण हक्क कायदा लागू होत नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे रात्रकालीन शाळांमध्ये समायोजन केले जाऊ शकत नाही तसेच कायद्यातील तरतूद अध्यादेशाद्वारे दुरुस्त करता येत नाही. परिणामी वादग्रस्त अध्यादेश रद्द करण्यात यावा व रात्रकालीन शाळांतील तदर्थ शिक्षकांच्या नियुक्त्या कायम ठेवाव्यात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने वरील अंतरिम आदेशासह शासनाला नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.