शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक उन्माद लोकच खवपून घेणार नाहीत

By admin | Updated: October 19, 2015 03:15 IST

देशात सध्या काही लोक धार्मिक उन्माद घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

विचारपूर्वक राज्य करा : सुशीलकुमार शिंदे यांचा सरकारला इशारानागपूर : देशात सध्या काही लोक धार्मिक उन्माद घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हा धार्मिक उन्माद देशात चालू शकत नाही. लोकही तो खपवून घेणार नाहीत, तेव्हा राज्यकर्त्यांनी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यांचा विचार करून राज्य करावे, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे दिला. मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार सोहळ्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, हा देश धर्मनिरपेक्ष आहे. डॉ. आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली असून ती धर्मनिरपेक्ष व लोकतांत्रिक आहे. या धर्मनिरपेक्ष देशात धार्मिक उन्माद चालू देणार नाही. लोकही ते चालू देणार नाही. या धार्मिक उन्मादाच्या विरोधात देशभरातील साहित्यिक त्यांना मिळालेले पुरस्कार परत करीत आहेत. त्याबाबत ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याच्या आणि एकूणच चळवळीमध्ये साहित्यिकांची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. तेव्हा देशातील साहित्यिक याप्रकारे आपला विरोध प्रकट करीत असतील तर ती साधीसुधी बाब नाही. पुरस्कार परत करणे, राजीनामा देणे हे सरकारसाठी चांगले संकेत नाहीत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. सनातन वरील बंदीबाबत विचारले असता यापूर्वीच आपण यावर प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.(प्रतिनिधी)