शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व नागपूरच्या दोन हजार भूखंडधारकांना दिलासा

By admin | Updated: July 18, 2016 02:34 IST

पूर्व नागपूरच्या बाह्य भागातील विविध आरक्षण वगळण्यात आल्यानंतर प्रस्तावित डी.पी. रोडचे आरक्षण वगळण्याची मागणी सातत्याने होत होती.

डी.पी. रोडचे आरक्षण रद्द : ३९ ले-आऊटला लाभ नागपूर : पूर्व नागपूरच्या बाह्य भागातील विविध आरक्षण वगळण्यात आल्यानंतर प्रस्तावित डी.पी. रोडचे आरक्षण वगळण्याची मागणी सातत्याने होत होती. आ. कृष्णा खोपडे यांनी नागरिकांच्या या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. शेवटी नासुप्रने पूर्व नागपुरातील काही डी.पी. रोडचे आरक्षण वगळण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ येथील सुमारे दोन हजार भूखंडधारकांना होणार आहे. मौजा भरतवाडा, पारडी, पुनापूर, चिखली येथील सुमारे ३९ ले-आऊट डी.पी. रोडच्या आरक्षणामुळे बाधित होते. येथे ४० वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी भूखंडांची रजिस्ट्री करून पक्की घरे बांधली होती. मात्र, आरक्षणामुळे संबंधित घरे नियमित होत नव्हती. भूखंड आरक्षित असल्यामुळे बांधकामासाठी बँकेकडून कर्ज मिळत नव्हते. संबंधित मालमत्तेच्या खरेदी विक्रीचे व्यवहार थांबले होते. नागरिकांच्या या प्रश्नासाठी ३ जुलै २०१६ रोजी हैदराबाद हाऊस येथे बैठक झाली. तीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे आदी उपस्थित होते. या बैठकीत संबंधित ३९ ले-आऊटमधील डी.पी. रोडचे आरक्षण वगळण्यावर चर्चा होऊन तसा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नासुप्रने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. (प्रतिनिधी)