लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक मतदार संघात गुरुवारी मतदान शांततेत पार पडले. नागपूरमध्ये सकाळपासूनच नागरिकांचा प्रचंड उत्साह होता. सकाळी आणि सायंकाळी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. कडक उन्हामुळे दुपारी मात्र आराम केल्याचे चित्र होते.नागपूर लोकसभा मतदार संघात सकाळपासूनच नागरिकांचा उत्साह दिसून येत होता. बहुतांश मतदार केंद्रांवर सकाळी ७ वाजता पासूनच मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. वर्धा रोडवरील उज्ज्वलनगर येथील वासंती शाळा मतदार केंद्रात तर सकाळी ७ वाजता मोठ्या संख्येने मतदार पोहोचले होते. असेच चित्र जवळपास सर्वत्र दिसून आले. उन्हामुळे लोकांनी सकाळीच मतदान करण्यास प्राधान्य दिले. पहिल्या दोन तासात ९.३३ टक्के लोकांनी मतदान केले. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी १७.५६ टक्केवर पोहोचली. दुपारी १ वाजेपर्यंत २७.४७ टक्के, दुपारी ३ पर्यंत ३८.५५ टक्के आणि ५ वाजेपर्यंत ५३.१३ टक्के होती. शेवटच्या एका तासात लोकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. सायंकाळी ६ वाजता रांगेत असलेल्यांन टोकन देऊन त्यांचे मतदान घेण्यात आले. अनेक ठिकाणी उशिरापर्यंत मतदान चालले. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील प्रक्रिया बरीच उशिरापर्यंत चालली. शेवटच्या तासात किमान ८ ते १० टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे नागपूर लोकसभा मतदार संघातील एकूण टक्केवारी ६० ते ६२ टक्केपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.दुसरीकडे रामटेकमध्ये मतदारांनी सकाळी मतदान करण्यात फारसा रस दाखवला नाही. लोक सकाळी बाहेर पडलेच नाही. सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ४.९ टक्के मतदान झाले. ९ नंतर मात्र लोक बाहेर निघाले. दुपारपासून त्यांचा फ्लो कायम होता. तो सायंकाळपर्यंत चालला.मोमीनपुऱ्यात भर उन्हातही मतदारांचा उत्साह कायम
नागपुरात सकाळी-सायंकाळी फ्लो दुपारी आराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:09 IST
पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक मतदार संघात गुरुवारी मतदान शांततेत पार पडले. नागपूरमध्ये सकाळपासूनच नागरिकांचा प्रचंड उत्साह होता. सकाळी आणि सायंकाळी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. कडक उन्हामुळे दुपारी मात्र आराम केल्याचे चित्र होते.
नागपुरात सकाळी-सायंकाळी फ्लो दुपारी आराम
ठळक मुद्देग्रामीणचे मतदार दुपारनंतरच पडले बाहेर