शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाते घट्ट करण्यासाठी प्रेम वाटणे आवश्यक

By admin | Updated: June 3, 2016 03:00 IST

नाते घट्ट करण्यासाठी प्रेम वाटणे आवश्यक आहे. यामुळे संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता राहत नाही,

अब्दुल बासित यांचे मत : ताजबाग दर्गा व दीक्षाभूमीला दिली भेटनागपूर : नाते घट्ट करण्यासाठी प्रेम वाटणे आवश्यक आहे. यामुळे संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता राहत नाही, असे मत पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले.अब्दुल बासित सध्या नागपुरात असून त्यांनी गुरुवारी ताजबाग दर्गा, दीक्षाभूमी व झिरो माईलला भेट दिली. दरम्यान, त्यांनी काही वेळ पत्रकारांशी संवाद साधला. भारत व पाकिस्तानमधील कटुता जगजाहीर आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रेम वाटण्याची भूमिका मांडल्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. नागपुरातील ताजबाग दर्गा व पाकिस्तानातील दर्ग्यांमध्ये काहीच फरक नाही. नागपूर फारच सुंदर शहर असून येथील नागरिक आदरातिथ्यप्रिय आहेत. त्यांच्याकडून फार प्रेम मिळत आहे, असेही बासित यांनी सांगितले.बासित यांनी सर्वप्रथम दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांना दीक्षाभूमीच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. दीक्षाभूमी समितीने त्यांचा सत्कारही केला. यानंतर ते देशाचे केंद्रस्थान असलेल्या झिरो माईल येथे पोहोचले. त्यांना झिरो माईलची विस्तृत माहिती देण्यात आली. येथून ते सायंकाळी ६.२० च्या सुमारास ताजबाग दर्गा येथे गेले. दर्ग्यात त्यांनी ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष शेख हुसेन व सचिव इकबाल वेलची यांच्यासोबत फातिहा पठण केले व दोन्ही देशांत शांती नांदण्याची प्रार्थना केली. मोठ्या मशिदीमध्ये त्यांनी नमाज पठण केले. या ठिकाणी त्यांनी किमान एक तास घालवला. दरम्यान, त्यांना हजरत बाबा ताजुद्दीन यांच्यासंदर्भात माहिती देण्यात आली.(प्रतिनिधी)