शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

चायना फटाक्यांना नकार, इको फे्रंडलीचे स्वागत

By admin | Updated: October 20, 2016 03:07 IST

दिवाळीत फटाके ही अत्यावश्यक बाब आहे. या सणासाठी फटक्यांची दुकाने सजली आहेत.

कमी प्रदूषण व आवाज : लोकांचा प्रतिसादनागपूर : दिवाळीत फटाके ही अत्यावश्यक बाब आहे. या सणासाठी फटक्यांची दुकाने सजली आहेत. यावर्षी व्यापाऱ्यांना उत्तम व्यवसायाची अपेक्षा आहे. दरवर्षी फटाक्यांमध्ये नवीन पाहायला मिळते. पण यावर्षी फटाका निर्मात्यांनी आगळवेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कमी प्रदूषण आणि आवाजाचे इको फ्रेंडली फटाके बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. रसायनाची कमी मात्रा आणि कागदापासून तयार केलेल्या फटाक्यांनी चायना फटाक्यांची जागा घेतली आहे. देशातील व्यापाऱ्यांनी चायना फटाक्यांवर टाकलेला बहिष्कार पाहता नागपुरातील विक्रेत्यांनीही विक्रीला नकार दिला आहे. सध्या नागपुरात शिवाकाशी येथील देशी आणि विशेषत: इको फ्रेंडली फटाक्यांची आवक होत आहे. त्याच्या किमतीत थोडीफार वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आकर्षक फटाक्यांची धूमफटाक्यांच्या संगीतमय माळा, किटकॅट फुलझडी, प्लॅस्टिक बंदूक, सायरन फुलझडी, मल्टीकलर पेंटिंग, क्रिसमस अनार, वेलकम अनार आदींची जास्त मागणी आहे. याशिवाय ४-स्क्वेअर, थ्रीडी, टायटॅनिक, क्रेकलिंग, जम्बो क्रेकलिंग आदी कमी आवाजाचे फटाके आहेत. तसेच सनड्रॉपसारखे कमी आवाजाच्या फटाक्याने प्रदूषण फारच कमी होणार आहे. फॅन्सी फटाक्यांमध्ये फ्लॉवर ड्राप, रेड कास्को, डेजलिंग, क्लासिक डान्स, गार्डन आॅफ हिडन, गोल्ड ब्लिटर आदींसह १५ प्रकारच्या वेगवेगळ्या आवाजाचे फटाके आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनले आहे. स्वदेशी फटाक्यांची विक्रीफटाका असोसिएशनचे सचिव रमेश बालानी यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी चायना फटाक्यावर अघोषित बहिष्कार टाकला आहे. जास्तीत जास्त फटाके शिवाकाशी येथून मागविण्यात आले आहेत. ९० टक्के कमी डेसिबलचे आहेत. शहरात ११ होलसेल व्यापारी आणि ५०० पेक्षा जास्त किरकोळ व्यापारी विक्री करीत आहेत. होलसेल व्यापारी नामदेव कारवटकर यांनी सांगितले की, यंदा चायना फटक्यांना दूर सारून देशात निर्मित फटाक्यांच्या विक्रीवर जास्त भर आहे. गांधीबाग, सेंट्रल एव्हेन्यू, इतवारी रोड या भागात दुकाने सजली आहेत.