शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाथजोगींच्या वारसदारांना संख्येनुसार भरपाईस नकार

By admin | Updated: November 2, 2016 02:49 IST

कळमना येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या तीन नाथजोगींच्या वारसदारांना संख्येनुसार भरपाई देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने

नागपूर : कळमना येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या तीन नाथजोगींच्या वारसदारांना संख्येनुसार भरपाई देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार देऊन संबंधित अवमानना याचिका खारीज केली.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी नुकताच हा निर्णय दिला. समाजसेवक दीनानाथ वाघमारे यांनी ही याचिका दाखल केली होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाने मयत नाथजोगी हसन दादाराव सोलंकी, सुपडा मगन नागनाथ व पंजाबराव भिकाजी शिंदे यांच्या वारसदारांना २४ आॅगस्ट २००४ व १ डिसेंबर २००८ रोजीच्या ‘जीआर’अनुसार भरपाई देण्याचा आदेश शासनास दिला होता. त्यानुसार शासनाने मयतांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई दिली. यावर याचिकाकर्त्याचा आक्षेप होता. मयताच्या प्रत्येक वारसदाराला पाच लाख रुपये भरपाई मिळायला पाहिजे. १० वारसदार असतील तर, ५० लाख रुपये भरपाई द्यायला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. परिणामी त्यांनी अवमानना याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे तथ्यहीन ठरविले. कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनातर्फे भरपाई दिली जाते. मोटर वाहन कायदा-१९८८ व कामगार भरपाई कायदा-१९८७ अंतर्गतही भरपाई देताना मयताचे किती वारसदार आहेत याचा विचार केला जात नाही असे न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. निहालसिंग राठोड तर, शासनातर्फे मुख्य वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)अशी घडली घटनामहिलांची वेशभूषा करून विविध शहरांत भिक्षा मागणे हा नाथजोगी समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. २०१२ मध्ये हे हत्याकांड घडले तेव्हा नागपुरात चोऱ्यांचे सत्र सुरू होते. नागरिक धास्तावलेले होते. कळमना हद्दीतील भरतवाडा येथे चार नाथजोगी महिलांची वेषभूषा करीत असताना ते चोर असल्याची अफवा परिसरात पसरली. नागरिकांनी एकत्र येऊन चौघांवरही हल्ला चढवला. या हल्यात हसन दादाराव सोलंकी (२५), पंजाबराव भिकाजी शिंदे (३०) व सुपडा मगन नागनाथ (४५) हे तिघे जागीच ठार झाले, तर पंजाबराव सोलंकी (४०) थोडक्यात बचावला. चारही नाथजोगी बुलडाणा जिल्ह्यातील मोहिदेपूर (ता. जळगाव जामोद) येथून आले होते.