शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

१५ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2016 03:20 IST

कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोरली-राऊळगाव दरम्यान झालेल्या प्राणघातक अपघातानंतर

न्यायालय : अपघातानंतर झाला होता दंगा नागपूर : कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोरली-राऊळगाव दरम्यान झालेल्या प्राणघातक अपघातानंतर दंगा भडकवल्याप्रकरणी तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डी. खोचे यांच्या न्यायालयाने १५ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी फेटाळून लावला. हंसराज नामदेव राणे (४४), राहुल लहूजी जीवतोडे (२४), श्रावण रामकृष्णा मरसकोल्हे (२१), सौरभ दादाराव वाढी (२०), सचिन पूंजाराम भुरसे (२१), पुंजाराम पुरुषोत्तम भुरसे (४७), विजय मारोतराव वाडकर (३३), चेतन तेजराम मोरे (१९), विजय गजानन बुरण (२५), भारत रामकृष्णा जीवतोडे (२५), आकाश दादाराव नागपुरे (१९), दादाराव विठोबा नागपुरे (५४), रवींद्र विठोबा नागपुरे (३४) , सुभाष पांडुरंग भिंगारे (५५) सर्व रा. डोरली (भिंगारे) तहसील काटोल, कृष्णा प्रभाकर बाहेकर (३०) रा. राऊळगाव, अशी आरोपींची नावे आहेत. प्रकरण असे की, १४ फेब्रुवारी २०१६ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास डोरली गावातील नीलिमा दादाराव नागपुरे आणि चंद्रकला सीताराम लोखंडे या दोघी शतपावली करीत असताना त्यांना एमएच-३१-डीएस-०७९४ क्रमांकाच्या मॅक्झिमो महिंद्रा या मालवाहू वाहनाची धडक लागून नीलिमा नागपुरे या जागीच मरण पावल्या होत्या तर चंद्रकला लोखंडे या गंभीर जखमी झाल्या होत्या. घटनेच्या वेळी हे वाहन समीर कवडूजी मेश्राम (२४) रा. डोरली हा चालवीत होता. या अपघातानंतर गावातील या आरोपींचा समावेश असलेल्या ४०-५० जणांच्या एका संतप्त जमावाने वाहनचालक रवींद्र कवडूजी मेश्राम, अमर कवडूजी मेश्राम यांच्या घरावर धडक देऊन त्याला हातबुक्क्यांनी मारहाण केली होती. घरात घुसून तोडफोड आणि नासधूस केली होती. मेश्रामच्या घरापुढील टीव्हीएस ज्युपीटर मोपेड रस्त्यावर आणून उलटवली होती. मॅक्झिमो महिंद्रा आणि मेश्राम यांच्या मालकीचे ग्रामपंचायत कॉम्प्लेक्समधील किराणा दुकान पेटवून दिले होते. या जमावाने ७ लाख ७५ हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले होते. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी रवींद्र नागपुरे याच्यासह ५० जणांविरुद्ध भादंविच्या १४३, १४७, १४९, ३३६, ४३५, ४३६, ४५२, ४२७, ३२३ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पंधरा आरोपींनी अ‍ॅड. ए. ए. मार्डीकर यांच्यामार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. ते न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पंकज तपासे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)