शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कार प्रकरणी जामीन फेटाळला

By admin | Updated: June 13, 2016 03:17 IST

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी अतिरिक्त

नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या न्यायालयाने मुख्य सूत्रधाराचा जामीन अर्ज फेटाळून लावला. शेख रिजवान शेख साबीर (२६), असे आरोपीचे नाव असून तो आॅटोचालक आहे आणि टिमकी लालपत्थर येथील रहिवासी आहे. पीडित मुलीला आपल्या आॅटोरिक्षातून नेताना रिजवान आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला, असा आरोप आहे. सावत्र आईच्या छळाला कंटाळून ही दुर्दैवी मुलगी आपल्या वेगवेगळ्या नातेवाईकांकडे राहायची . तिचे नातेवाईक लग्न करून देणार असल्याने ती १९ जून २०११ रोजी पळून जाऊन नागपूर रेल्वेस्थानकावर गेली होती. २४ जून २०११ रोजी ती चहा घेण्याकरिता रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडताच तिला रिजवानने गाठले होते. मदत करण्याचे आमिष दाखवून तो तिला आपल्या आॅटोरिक्षातून एका महिलेच्या घरी घेऊन गेला होता. माझ्या बहिणीची मुलगी असल्याचे तिला सांगितले होते. काही वेळानंतर त्याने पीडित मुलीला जबरदस्तीने आॅटोरिक्षात बसवून शहरातील विविध भागात नेले होते. तिला एका गोदामात नेऊन तिच्यावर एकट्याने बलात्कार केला होता. त्यानंतर त्याचे दोन मित्र त्याला भेटले होते. नंतर या तिघांनी तिला बसमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार केला होता. कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही तिला देण्यात आली होती. त्यांनी तिला रेल्वेस्थानकावर पोहोचवून दिले होते. वाहीद खान नावाच्या इसमाने पीडित मुलीला मदत करून पोलीस ठाण्यात नेले होते. सीताबर्डी पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून भादंविच्या ३६६ -ए, ३७६ (२)(जी) आणि ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून रिजवान याला २६ फेब्रुवारी २०१६ रोजी अटक केली होती. अद्याप त्याचे साथीदार पोलिसांना गवसले नाहीत. दरम्यान आरोपी रिजवान याने केलेला जामीन अर्ज प्रकरण गंभीर असल्याने फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील संदीप डोंगरे यांनी काम पाहिले. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक पां. भा. ठोंबरे आणि सहायक पोलीस निरीक्षक जी. पी. राऊत हे आहेत. (प्रतिनिधी)