शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लिव्ह इन रिलेशनशिपनंतर लग्नास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 10:17 IST

तीन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिप ठेवल्यानंतर आता लग्नास नकार देणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देबँक अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिप ठेवल्यानंतर आता लग्नास नकार देणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. प्रीतेश परतेकी (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. तो बोरगावमधील एकतानगरात राहतो. तक्रारदार तरुणी (वय २४) उच्चशिक्षित असून, तिने कायद्याचेही (विधी) शिक्षण घेतले आहे.तरुणी आणि आरोपी प्रीतेश या दोघांचे तीन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. घरच्यांना त्याची कुणकुण लागल्यानंतर दोघांनीही लग्न करणार असल्याचे घरच्यांना सांगितले. त्यामुळे घरच्यांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली. त्यानंतर त्यांनी शरीरसंबंध प्रस्थापित करणे सुरू केले. दरम्यान, प्रीतेश बँकेतील नोकरीच्या निमित्ताने चेन्नईला गेला. तेथे तरुणीही गेली. हे दोघे एकाच सदनिकेत लिव्ह इनमध्ये राहू लागले. तेथे त्यांच्यात खटके उडायला लागले. प्रीतेश तिला मारहाण करून रुममध्ये बंद करायचा आणि ड्युटीवर निघून जायचा. २५ मे २०१५ ते १२ एप्रिल २०१८ या कालावधीत हे सर्व झाले. दरम्यान, प्रीतेशची नागपुरात बदली झाली. त्यामुळे हे दोघे येथे परतले. आता तरुणीने त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावला असता आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिला.तरुणीसह घरच्यांनीही त्याची समजूत काढण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र, तो ऐकायला तयार नसल्याने अखेर तरुणीने त्याच्याविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांकडे शनिवारी तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. राठोड यांनी आरोपी प्रीतेशविरुद्ध बलात्कार, मारहाण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट