शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवणगावातील २३१ कुटुंबांना पुनर्वसनाचा लाभ

By admin | Updated: August 8, 2014 01:08 IST

शिवणगावातील २३१ कुटुंबांना गावठाणाबाहेर दाखविण्यात आल्यामुळे त्यांना पुनर्वसनाच्या फायद्यापासून वंचित राहावे लागणार होते. परंतु त्या सर्व कुटुंबांना गावठाणात समाविष्ट करून त्यांना

फडणवीस यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकनागपूर : शिवणगावातील २३१ कुटुंबांना गावठाणाबाहेर दाखविण्यात आल्यामुळे त्यांना पुनर्वसनाच्या फायद्यापासून वंचित राहावे लागणार होते. परंतु त्या सर्व कुटुंबांना गावठाणात समाविष्ट करून त्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळणार असल्याचे आश्वासन आमदार देवेंद्र फडणवीस यांना एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले. कार्गोहब बाधित शेतकरी आणि रहिवाशांच्या विविध मागण्यांबाबत आमदार देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेतली. बैठकीत शिवणगावातील विक्तुबाबानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना ३५० चौरस फूट जागा न देता त्यांच्या ताब्यात असलेल्या भूखंडाएवढा भूखंड देण्याची मागणी आ. फडणवीस यांनी केली. यावर एक प्रस्ताव तयार करून प्राधिकरणाला पाठविण्याचे आश्वासन एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले. मिहान परिसरातील शेतकरी, बिगर शेतकरी या प्रलंबित मुद्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशानुसार ११०३ शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवणगाव, जयताळा, भामटीच्या नागरिकांच्या पुनर्वसनातील अडचणी दूर करण्यासाठी एक समिती स्थापन करावी, या आ. फडणवीस यांच्या मागणीला जिल्हाधिकारी आणि एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी मान्यता देऊन तेथील प्रकल्पग्रस्तांना १५ दिवसात मोजणी करून भूखंड हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. येथील भू-संपादनातील अडचणीबाबतचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. बैठकीला जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, एमएडीसीचे मुख्य अभियंता चहांदे, संयुक्त नागरिक कृती समितीचे विजय राऊत, किशोर वानखेडे, संजय महल्ले, प्रकाश भोयर आणि शिवणगाव, जयताळा, भामटी परिसरातील प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)