शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त आवरमारा गावाचे पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 19:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पग्रस्त आवरमारा (ता. कुही) गावाचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून गावकऱ्यांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी विनंती मुंबई उच्च न्यायालया च्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. यासंदर्भात शेतकरी कवडू वंजारी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.गोसेखुर्द प्रकल्प व कन्हान नदीच्या पाण्यामुळे ...

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : नागरिकांना सोसावा लागतोय विविध त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पग्रस्त आवरमारा (ता. कुही) गावाचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून गावकऱ्यांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. यासंदर्भात शेतकरी कवडू वंजारी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.गोसेखुर्द प्रकल्प व कन्हान नदीच्या पाण्यामुळे गावकऱ्यांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. हे गाव कन्हान नदीच्या काठावर वसले आहे. गावाच्या उत्तर व पूर्व बाजूला नदीचा वेढा आहे तर, दक्षिण बाजूला गोसेखुर्दचा मोठा कालवा आहे. त्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण गाव जलमय होते. भविष्यात मोठा पाऊस झाल्यास गावकऱ्यांना प्राण वाचविण्यासाठी गाव खाली करावे लागू शकते. सध्या गावातून बाहेर पडण्यासाठी मातीगोट्यांचा एकच मार्ग आहे. गावकऱ्यांची शेती कन्हान नदीच्या दोन्ही बाजूला आहे. शेतात जाण्यासाठी नावेने नदी ओलांडावी लागते. नावेत शेती यंत्रे, खते, कीटकनाशके इत्यादी साहित्य नेताना अडचणी येतात. धरणाच्या व नदीतील पाण्यामुळे डास व अन्य कीटकांचा त्रास वाढला आहे. त्यातून आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. परिणामी, उर्वरित जमीन संपादित करून गावकऱ्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात सरकारला निवेदन सादर करण्यात आले होते, पण त्याची दखल घेण्यात आली नाही असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. सरकारने धरणातील पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करून गावकºयांना कायद्यानुसार भरपाई द्यावी व आरोग्यविषयक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असणारी जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.केंद्र व राज्य सरकारला नोटीसउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी केंद्र सरकार, राज्य पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी व गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावून यावर १३ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, यादरम्यान सरकारला पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्याची मोकळीक देण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रकाश रणदिवे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पHigh Courtउच्च न्यायालय