शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी ७९ हजार शेतकºयांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:07 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ७९ हजार शेतकºयांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतला आढावा : एकही लाभार्थी वंचित राहू नये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ७९ हजार शेतकºयांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत.आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच तहसीलदार, मंडळ अधिकारी, कृषी सहायक व तलाठी यांनी प्रत्येक गावात शेतकºयांच्या बैठकी घेऊन आॅनलाईन कर्जमाफीचे अर्ज १५ सप्टेंबरपूर्वी भरून घ्यावेत, अशा सूचनाही दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचतभवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. कर्जमाफीसंदर्भात राष्ट्रीयकृत बँकांनी तात्काळ लाभार्थी शेतकºयांच्या याद्या संबंधित तहसीलदाराकडे उपलब्ध करून द्याव्यात.तहसीलदारांनी यातून गावनिहाय याद्या तयार कराव्यात. कुणी सुटत असतील तर त्यांचे आॅनलाईन अर्ज भरून घ्यावेत. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी उपविभागीय महसूल अधिकाºयांनी घ्यावी. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अद्यापपर्यंत ज्या शेतकºयांना योजनेची माहिती नाही अशा सर्व शेतकºयांकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घ्यावेत, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, अविनाश कातडे, जिल्हा उपनिबंधक एस.एल. भोसले, लिड बँक मॅनेजर अयुब खान, तसेच सर्व तहसीलदार, बँकेचे व्यवस्थापक, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घ्यावाशासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी प्रत्येक बँकेच्या शाखेत शेतकरी कर्जदारांना माहिती देण्यासाठी तसेच आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँकेच्या अधिकाºयांना केल्या.टाळाटाळ करणाºया बँकावर नाराजीपात्र लाभार्थ्यांच्या याद्या देण्यासाठी टाळाटाळ करणाºया बँकेबद्दल नाराजी व्यक्त करून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना सूचना देऊन सायंकाळपर्यंत तहसीलदारांकडे बँकनिहाय याद्या प्राप्त होतील या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.१.६० लाख शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज बाकीजिल्ह्यातील मंडळ तसेच ग्रामपंचायत स्तरापर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी ६२४ बायोमेट्रिक केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवसात ६७ हजार आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले असून आजपर्यंत ७९ हजार अर्ज भरण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. जिल्ह्यात सुमारे १ लक्ष ६० हजार शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरून घ्यायचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.शेतकºयांसाठी टोल फ्री क्रमांककर्जमाफी योजनेचा लाभ घेताना शेतकरी सभासदांना आॅनलाईन अर्ज भरताना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ७८८७४६३२९० हा स्वतंत्र टोलफ्री क्रमांक सुरू केला आहे. शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरताना बॉयोमेट्रिक संदर्भात तसेच इतर कुठलीही अडचण आल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.जिल्हाधिकाºयांचे काम चांगले, प्रभावीजिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे शासनाच्या योजनांचे काम चांगले आणि प्रभावीपणे करीत आहेत. त्यांच्या कामावर सरकार समाधानी आहे, अशी पावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. पण तालुका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी मात्र सुस्त आहेत, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या प्रयत्नांवरच या योजनेचे यश अवलंबून आहे, हे लक्षात घ्यावे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत हलगर्जी झाली तर खपवून घेतली जाणार नाही, असेही पालकमंत्री आणि जिल्हाधिकाºयांनी सर्व अधिकाºयांना सांगितले.