शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
14
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
15
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
16
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
17
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
18
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
19
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
20
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

रक्त उपलब्ध असतानाही देण्यास नकार

By admin | Updated: October 19, 2016 03:18 IST

वैद्यकीय उपचारांदरम्यान किंवा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करीत असताना रक्त व रक्तघटकांची उपलब्धता महत्त्वाची मानली जाते.

मेडिकलच्या आदर्श रक्तपेढीतील प्रकार : सिकलसेलच्या रुग्णाच्या जीवावर बेतलेनागपूर : वैद्यकीय उपचारांदरम्यान किंवा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करीत असताना रक्त व रक्तघटकांची उपलब्धता महत्त्वाची मानली जाते. परंतु आदर्श रक्तपेढी म्हणून मान मिळविलेल्या मेडिकलच्या रक्तपेढीत अजब कारभार सुरू आहे. रक्त उपलब्ध असताना रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून रक्त आणावे लागत आहे. विशेष म्हणजे, खासगी रक्तपेढीतून रक्ताची जमवाजमव करताना मोठा वेळ जात असल्याने रुग्णाच्या जीवावर बेतत आहे. रविवारी अशाच एका प्रसंगाला सिकलसेलच्या रुग्णाला सामोरे जावे लागले. यात त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सिकलसेलग्रस्त २४ वर्षीय युवकाला शनिवारी मेडिकलच्या वॉर्ड क्र. ९ मध्ये भरती करण्यात आले. रविवारी त्याची प्रकृती खालवल्याने सकाळी ११ वाजता तेथील निवासी डॉक्टराने रक्त आणण्याची सूचना रुग्णाच्या नातेवाईकांकडे केली. नियमानुसार संबंधित डॉक्टराने मेडिकलच्या रक्तपेढीला तसे पत्र देणे आवश्यक होते. परंतु पत्र न देताच रुग्णाचे केसपेपर देऊन रक्तपेढीत पाठविले. रक्तपेढीतील अधिकाऱ्याने केसपेपरवर कुठलीही नोंद न टाकता ‘ए पॉझिटीव्ह’ रक्त गट नसल्याचे सांगून नातेवाईकाला परत पाठविले. याची माहिती नातेवाईकांनी संबंधित निवासी डॉक्टराला दिली. त्यांनी बाहेरुन रक्त आणण्यास सांगितले. त्याच डॉक्टराने रुग्णाच्या रक्ताचा नमुनाही काढून दिला. खासगी रक्तपेढीतून रक्ताची जमावाजमव करण्यास दुपारचे ४ वाजले. यावेळी डॉक्टर उपस्थित नव्हते. सायंकाळी ६ वाजता डॉक्टर आल्यानंतर त्यांनी रक्त चढवले. तब्बल सात तासानंतर रुग्णांला रक्त मिळाले. या दरम्यान रुग्णाची प्रकृती अधिक खालवली. सोमवारी पहाटे त्या युवकाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला रक्त उशिरा मिळाल्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु या संदर्भात संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी कुठलीही तक्रार केली नाही. यामुळे प्रकरणाची चौकशी झाली नसल्याचे समजते.(प्रतिनिधी)‘त्या’दिवशी १९ रक्तपिशव्या उपलब्ध होत्या‘लोकमत’ने या संदर्भात चौकशी केली असता मेडिकलच्या रक्तपेढीत त्या दिवशी, रविवारी ‘ए पॉझिटीव्ह’ रक्तगटाच्या १९ रक्तपिशव्या उपलब्ध होत्या. रजिस्टरवर तशी नोंद आहे. असे असताना रक्तपेढीच्या अधिकाऱ्याने संबंधित रक्तगटाचे रक्त नसल्याचे सांगण्यामागे नेमका हेतू काय, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असेच प्रकार इतरही रुग्णांसोबत होत असल्याची माहिती आहे. रुग्णाच्या केसपेपरवर खासगी रक्तपेढीचे स्टीकर चिटकविले आहे.