शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड बळकावण्याचे दोषारोपपत्र रद्द करण्यास नकार : हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:57 IST

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील आरोपी डॉ. अनिलकुमार श्यामस्वरूप शुक्ला याच्याविरुद्ध भूखंड बळकावण्याच्या प्रकरणात दाखल एफआयआर व दोषारोपपत्र रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला. यासंदर्भात शुक्लाने रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांनी ती याचिका फेटाळून शुक्लाला दणका दिला.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील आरोपीला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील आरोपी डॉ. अनिलकुमार श्यामस्वरूप शुक्ला याच्याविरुद्ध भूखंड बळकावण्याच्या प्रकरणात दाखल एफआयआर व दोषारोपपत्र रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला. यासंदर्भात शुक्लाने रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांनी ती याचिका फेटाळून शुक्लाला दणका दिला.शुक्ला व इतर आरोपींविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४७८, ४७४, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. आरोपींविरुद्ध न्याय दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शुक्लाविरुद्धचे सर्व आरोप खोटे आहेत. त्याच्याविरुद्ध काहीच पुरावे नाहीत. त्यामुळे खटला चालविल्यास तो निर्दोष सुटेल व कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग होईल. करिता, शुक्लाविरुद्धचा एफआयआर व दोषारोपपत्र रद्द करावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती.न्यायालयाने याचिकाकर्त्याचा बचाव खोडून काढला. प्रकरणातील भूखंड बनावट दस्तावेज तयार करून बळकावण्यात आला व मूळ मालकांची फसवणूक करण्यात आली. शेषनाथ सिंग हा प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. परंतु, शुक्लाही या गुन्ह्यामध्ये सामील असल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसून येते. शुक्लाने २००६ मध्ये संबंधित भूखंड खरेदी केला व त्यानंतर तो भूखंड २०१५ मध्ये तिसऱ्या व्यक्तीला विकला. त्याकरिता शुक्लाने मुख्य आरोपी शेषनाथ सिंगलाच पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी करून दिली होती. शुक्लाने या भूखंडाचा मूळ मालकाकडून बळजबरीने ताबा घेतला होता. त्याच्याविरुद्ध साक्षीदार आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्धचे आरोप आधारहीन असल्याचे व त्याच्याविरुद्धचे प्रकरण कायम ठेवल्यास कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग होईल असे म्हणू शकत नाही असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी