शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क परत करा अन्यथा शाळांच्या अध्यक्ष-मुख्याध्यापकांना बेड्या घालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिक्षण विभागाने पालकांकडून कोट्यवधींची अतिरिक्त शुल्क वसुली करणाऱ्या सहा ‘सीबीएसई’च्या शाळांना दणका दिला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिक्षण विभागाने पालकांकडून कोट्यवधींची अतिरिक्त शुल्क वसुली करणाऱ्या सहा ‘सीबीएसई’च्या शाळांना दणका दिला आहे. मात्र, संबंधित शाळा न्यायालयात गेल्या आहेत. मात्र, या शाळा किती वेळ न्यायालयात जातील. जर शुल्क परत केले नाही तर अध्यक्ष असो किंवा मुख्याध्यापक, त्यांना तुरुंगात टाकूच, या शब्दात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे. पहिल्यांदाच ‘सीबीएसई’ शाळांवर होत असलेल्या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आम्ही नुकतीच पाच शाळांवर कारवाई केली आहे. ही कारवाई पूर्ण झाली की, उरलेल्या १५ ते २० शाळांविरोधात देखील पावले उचलू. कारवाई केली की, शाळा न्यायालयात जातात व तेथे स्थगिती मिळते. मात्र, हा जो खेळखंडोबा सुरू आहे त्यावर आमचे बारीक लक्ष आहे. गरीब पालकांकडून अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या शाळांकडून त्याची वसुली करूच, असे कडू यांनी स्पष्ट केले. गुरुवारी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली व अंतिम कारवाई कशी करता येईल, यावर चर्चा झाली. अतिरिक्त शुल्क परत केले नाही तर शाळांच्या मालमत्ता जप्त करू व बँक खाते सील करण्याचेदेखील पाऊल उचलू, असेदेखील कडू यांनी सांगितले.

कृती आराखडा तयार करणार

शाळांकडून वसुली न झाल्यास विभाग कोणती कारवाई करेल, याबाबत कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष वकिलाची नेमणूकही करण्यात येणार आहे. याशिवाय शाळांनी वर्षनिहाय घेतलेल्या शुल्काचा तपशील तपासून त्यातून केलेल्या शुल्कवाढीबाबत माहिती एकत्र करेल. यावर संस्थेची संचालकांसमोर होणारी सुनावणी होत असताना, त्यांच्याविरुद्ध पुरावे देणे, न्यायालयासमोर कुठल्याही प्रकारे बाजू कमजोर होऊ नये याचाही अभ्यास करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आणखी १२ शाळांविरोधात कारवाई होणार

अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या आणखी १२ शाळांना विचारणा करण्यात आली असून त्यांच्याकडून विभागाला माहिती देण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता ही माहिती मिळविण्यासाठी खुद्द उपसंचालक या शाळांमध्ये जाणार आहे. ज्या शाळा माहिती देणार नाही. त्या शाळांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.