शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांची आवक कमी; किमती वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:06 IST

नागपूर : स्थानिक आणि अन्य जिल्ह्यातून भाज्यांची आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. वाढत्या महागाईत ...

नागपूर : स्थानिक आणि अन्य जिल्ह्यातून भाज्यांची आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. वाढत्या महागाईत सामान्यांचे महिन्याचे बजेट वाढले आहे. त्यातच भाज्यांच्या दरवाढीची भर पडल्याने महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ साधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

एक महिन्यापूर्वी लॉकडाऊनमुळे भाज्यांची विक्री कमी होती. त्या तुलनेत आवक जास्त होती. ग्राहक मर्यादित भाज्या खरेदी करीत होते. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट आणि हातठेल्यावर पदार्थ विकणाऱ्यांवर बंदी आणि लग्नकार्य बंद असल्याने भाज्यांचा उठाव कमी होता. स्थानिक शेतकऱ्यांकडून मालाची आवकही मागणीच्या तुलनेत जास्त होती. त्यामुळे भाज्या सामान्यांच्या आटोक्यात होत्या. शेतकऱ्यांची पेरणी आटोपल्यानंतरच भाज्यांची लागवड करतील. या भाज्या गणेशोत्सवात येतील. सध्या किरकोळ बाजारात पत्ता कोबी, टोमॅटो आणि वांगे वगळता सर्वच भाज्यांचे दर ४० ते ५० रुपये किलो आहेत. आणखी दोन महिने भाज्या जास्त भावात खरेदी कराव्या लागतील, असे मत महात्मा फुले फ़्रूट अ‍ॅण्ड सब्जी असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी व्यक्त केले.

सध्या फूलकोबी नागपूर जिल्हा, नाशिक आणि औरंगाबाद येथून कॉटन मार्केट आणि कळमना मुख्य बाजारात विक्रीसाठी येत आहे. सिमला मिरची टाटानगर, तोंडले व परवळ भिलाई व दुर्ग, टोमॅटो नाशिक, संगमनेर, हिरवी मिरची मौदा, परतवाडा व रायपूर, कोथिंबीर नागपूर जिल्ह्यालगतच्या मध्य प्रदेशच्या भागातून येत आहेत. फूलकोबी ४० ते ५० रुपये किलोवर गेली असून आवक वाढल्यास भाव कमी होतील. मेथीचे भाव ६० रुपयांवर गेले आहेत. पंढरपूर येथून आवक वाढल्यास भावात घसरण होईल. आता हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू झाल्याने विक्रीत वाढ झाली आहे. सध्या ठोक मार्केटची साखळी तुटली आहे. ती पूर्ववत होण्यास आणखी काही दिवस लागतील, असे राम महाजन म्हणाले.

रविवारी किरकोळ बाजारात किलो भाज्यांचे भाव :

फूलकोबी ४० रुपये, पत्ताकोबी २०, वांगे ३०, हिरवी मिरची ४०. टोमॅटो ३०, कोथिंबीर ५०, चवळी शेंग ४०. गवार ४०. कारले ४०. सिमला मिरची ४०. परवळ ४०. दोडके ३० ते ४०. कोहळे ४०. पालक १५ ते २०, मेथी ६०, चवळी २०, फणस ५०, कैरी ४०. काकडी ४०. मूळा ३०, गाजर ४०.

कांदे व बटाटे आटोक्यात; शासनाकडून कांदे खरेदी

पावसामुळे कांदे खराब झाले असले तरीही बाजारात आवक चांगली आहे. एक महिन्यापासून भाव ५० पैसे ते १ रुपयांनी वाढतच आहेत. रविवारी कळमन्यात ठोक बाजारात उत्तम दर्जाचे लाल कांदे २० ते २२ रुपये, पांढऱ्या कांद्याचे भाव १७ ते १८ रुपये किलो होते. लाल कांद्याची आवक बुलडाणा, अहमदनगर आणि नाशिक तर पांढरे कांदे अमरावती, अकोला आणि गुजरात येथून आहे. लाल कांदे दररोज १३ ते १५ ट्रक व पांढऱ्या कांद्याचे ५ ते ७ ट्रक येत आहेत. साठवणुकीच्या उन्हाळी कांद्याची खरेदी राज्य शासन नाफेडच्या माध्यमातून खरेदी करीत आहे. शेतकऱ्यांना जागेवरच २० ते २२ रुपये भाव मिळत आहे. शिवाय निर्यात वाढली आहे. त्यामुळे दसरा, दिवाळीपर्यंत भाव कमी होणार नसल्याची माहिती कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी दिली. सध्या चांगल्या मालाचे शार्टेज असून कळमन्यात कमी दर्जाचे कांदे येत असून भाव १२ ते १५ रुपये आहेत. हा कांदा जास्त दिवस टिकत नाहीत.

कळमन्यात बटाट्याची आवक आग्रा व कानपूर येथून असून दररोज २० ते २२ ट्रक येत आहे. ठोकमध्ये किलो भाव १२ ते १३ रुपये आहे. यंदा बटाट्याची उत्पादन मोठ्या प्रमाणात आल्याने वाढण्याची शक्यता नसल्याचे वसानी म्हणाले.