शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनाची पूर्तता करा

By admin | Updated: June 22, 2017 02:25 IST

नागपूर लोकसभा निवडणुकीत मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करा या मागणीसाठी भीमसेनेच्या वतीने इंदोरा चौकातून ...

भीमसेनेची गडकरी यांच्याकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर लोकसभा निवडणुकीत मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करा या मागणीसाठी भीमसेनेच्या वतीने इंदोरा चौकातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील वाड्यावर मोर्चाचे आयोजन केले. मोर्चाचे स्वरूप पाहून हा मोर्चा पाचपावली पोलीस ठाण्याजवळ अडविण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने गडकरींच्या स्विय सहायकांना निवेदन सादर केले. झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे द्या, शहरातील १० लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, एसएनडीएल कंपनीचा करार रद्द करून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला काम द्यावे, नागपूर शहरातील ४० टक्के अनुसूचित जाती, जमातीतील, शोषित, पीडित, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना राहण्यासाठी घर, मेट्रो रेल्वे, मिहान, कोराडी थर्मल पॉवर, मौदा थर्मल पॉवरमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, मुस्लिमांना समान अधिकार, दिल्लीत ख्रिश्चन ननवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, बेरोजगारांना मासिक पाच हजार भत्ता आदी मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी रेटून धरल्या. इंदोरा चौकातून भव्य मोर्चा काढल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी पाचपावली पोलीस ठाण्याजवळ हा मोर्चा अडवून धरला. त्यानंतर भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर साळवे, केंद्रीय प्रभारी मनोज बंसोड, राजा नगराळे, आकाश टेंभुर्णे, डॉ. महेश अंबादे, अज्जू शेख, तारीक शेख, राजेश पेंटर, दानिश आगाशे, सोनू सांगोडे, रविकांत जनबंधु, साधना काटकर, नेहा तेजवानी यांच्या शिष्टमंडळाने नितीन गडकरींचे स्विय सहायक दीक्षित यांना निवेदन सादर केले. निवेदनावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दीक्षित यांनी गडकरींच्या वतीने शिष्टमंडळास दिले. मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते.