शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन बसच्या मार्गात आरटीओचा रेड सिग्नल

By admin | Updated: September 30, 2015 06:31 IST

महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवरील ग्रीन बसला शहरात चालविण्याची फेब्रुवारी २०१५ मध्ये परवानगी दिली

नागपूर : महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवरील ग्रीन बसला शहरात चालविण्याची फेब्रुवारी २०१५ मध्ये परवानगी दिली होती. परंतु ही मुदत संपली असतानाही अद्याप वाढीव परवानगी नसल्याचे परिवहन विभागाचे (आरटीओ) म्हणणे आहे. विभागीय परिवहन प्राधिकरणचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या परवानगीनंतरच बसला मुदतवाढ मिळणार आहे. त्यामुळे विना परवानगी ग्रीन बस शहरात धावत असल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिका प्रशनासनाने स्कॅनिया कंपनीला प्रायोगिक तत्त्वावर शहरातील मॉरिस कॉलेज ते खापरी नाका या दरम्यान सहा महिने ग्रीन बस चालविण्याला परवानगी दिली होती. हा करार १८ आॅगस्टला संपला आहे. त्यामुळे कराराला फेबु्रवारी २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मनपा व स्कॅनिया कंपनीत या बाबतचा करार करण्यात आला आहे. परंतु याबाबतची माहिती परिवहन विभागाला देण्यात आलेली नाही. मुदतवाढीबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. या संदर्भात कंपनीला कळविण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. महापालिका व कंपनी दरम्यानाचा सुरुवातीचा करार संपला आहे. परंतु मनपा व स्कॅनिया कंपनी यांच्यातील या कराराचा अवधी वाढविण्यात आला आहे. त्यानुसार मॉरिस कॉलेज ते खापरी दरम्यान एमएच ३१ डीएस-६३३७ या क्रमांकाची ग्रीन बस सुरू असल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त यांनी दिली. मनपाने एक वर्षासाठी ही बस प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी परिवहन विभागाकडून अनुमती घेतली आहे. याची मुदत संपली आहे. सहा महिन्यापैकी केवळ १०२ दिवस ही बस शहरात चालविण्यात आली. प्रायोगिक अहवालाच्या आधारे या बसला देशभरात चालविण्यासाठी अनुमती दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)