शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

प्रशासनामुळे अडली परिचारिकांची भरती

By admin | Updated: May 9, 2014 02:19 IST

'हेल्थ पोस्ट' साठी ६0 परिचारिकांच्या भरतीचे प्रकरण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडले आहे. इतकेच नव्हे तर मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी एक वर्ष होऊनही नियुक्ती न झाल्याने ही नियुक्ती ..

नागपूर : 'हेल्थ पोस्ट' साठी ६0 परिचारिकांच्या भरतीचे प्रकरण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडले आहे. इतकेच नव्हे तर मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी एक वर्ष होऊनही नियुक्ती न झाल्याने ही नियुक्ती प्रक्रियाच थांबविण्याची शिफारस केली आहे. संबंधित हेल्थ पोस्ट'मधील डॉक्टर आणि परिचारिकांचे वेतन देण्यास केंद्र सरकार तयार होते. अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक भरती अडकवून ठेवण्यात आली. या प्रकरणात थेट आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश तोतवानी यांनी पत्रपरिषदेद्वारा केली आहे.तोतवानी यांनी सांगितले की, हेल्थ पोस्टसाठी १५ पैकी १२ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन जागा आरक्षित असल्याने ती पदे भरण्यात आलेली नाही. परिचारिकांची नियुक्ती होऊ न शकल्याने डॉक्टरांचे वेतन महापालिकेलाच द्यावे लागत आहे. २00९ मध्ये हेल्थ पोस्टसाठी जाहिरात काढण्यात आली. मुलाखती झाल्या. १५ डॉक्टर, ६0 नर्स आणि १६ मिडवाईफ नर्सच्या नियुक्तीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली. २0१0 मध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. परंतु परिचारिकांची नियुक्ती मात्र अडकली. परिचारिकांच्या नियुक्तीसाठी २२ एप्रिल २0१२ रोजी मनपा आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र पाठवून त्यासंदर्भात सूचना मागविल्या. २५ मे २0१२ ला पत्र आले की परिचारिकांची भरती करता येऊ शकते.२८ सप्टेंबर २0१२ ला मनपा सभागृहात प्रस्तावाला मंजुरी मिळाली. चार महिन्यानंतर अंमलबजावणी करण्याची तयारी झाली. मुलाखती व इतर प्रक्रियाही पार पडल्या. परंतु नियुक्ती मात्र झाली नाही. एक वर्ष उलटल्यानंतर मनपाने पुन्हा १२ मार्च २0१४ ला राज्य सरकारला पत्र पाठविले आणि केलेली नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे. (प्रतिनिधी)