शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

नागपुरात एन्ट्री च्या नावाने खंडणी वसुली : आयजींच्या स्टेनोकडून उकळली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:19 IST

पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयातील लघुलेखकाकडून (स्टेनो) एन्ट्री फीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या तीनपैकी दोन भामट्यांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्दे‘एन्ट्री‘ चा विषय गरम : अंबाझरीत गुन्हा, दोघांना अटक, एक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयातील लघुलेखकाकडून (स्टेनो) एन्ट्री फीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या तीनपैकी दोन भामट्यांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली. पवन रमेश शेरेकर (वय २९), राहुल शंकरराव गवई (वय २७), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर, त्यांचा सौरव मडावी नामक साथीदार फरार आहे.भक्तिमंदिर, कुंभारवाडा (अमरावती) येथील रहिवासी नितीन रामदास नांदूरकर (वय ४५) विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात लघुलेखक (स्टेनो) आहेत. ते मुळचे अमरावतीचे रहिवासी असून गेल्या वर्षभरापासून ते अमरावती-नागपूर जाणे येणे करतात. शनिवारी दुपारी काम आटोपल्यानंतर नांदूरकर आणि त्यांचा मित्र सतीश चव्हाण दुपारी ४.१५ वाजता त्यांच्या स्वीफ्ट कार(एमएच २७/ डीई २०११)ने नागपूरहून अमरावतीकडे जायला निघाले. भरतवाडा बसथांब्याजवळ आरोपी शेरेकर, गवई आणि मडावीने त्यांची कार अडवली. येथून पुढे जाण्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील, असे आरोपी म्हणाले. १०० रुपये दिले नाही तर तुम्ही येथून कार घेऊन पुढे जाऊ शकत नाही, असे आरोपी म्हणाले. नांदूरकरने स्वत:चा परिचय देताच शेरेकर आणि साथीदाराने त्यांना धमकी दिली. एवढेच नव्हे तर आरोपींनी सतीश चव्हाण यांच्या खिशातून एन्ट्रीच्या नावाखाली खंडणीसारखे १०० रुपये जबरदस्तीने वसूल केले. नांदूरकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून खंडणी वसुलीची माहिती दिली. त्यानंतर अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिकाºयाच्या कार्यालयातील कर्मचाºयाशी संबंधित असल्यामुळे अंबाझरी पोलिसांनी धावपळ करून घटनास्थळ परिसरातील दुकानदारांकडे विचारणा केली. या भागातील कुख्यात गुंड शेरेकर नेहमीच या भागात छोट्याछोट्या दुकानदारांकडून, वाहनचालकांकडून खंडणी वसुली करीत असतो, अशी माहिती पुढे आली. त्याची या भागात प्रचंड दहशत असल्याने कुणी वाच्यता करीत नाहीत. दरम्यान, पोलिसांनी धावपळ करून रविवारी आरोपी शेरेकर आणि गवईला अटक केली. तिसरा आरोपी मडावी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.आरटीओचा अविर्भाव !विशेष म्हणजे, महामार्गावर रात्रीच्या ठिकाणी आरटीओतील दलाल कारवाईचा धाक दाखवून एन्ट्रीच्या नावाखाली खंडणी वसूल करतात. त्यांनी वाहनचालकांकडून रक्कम गोळा करण्यासाठी रोजंदारीवर गुंडांच्या टोळ्या ठेवल्या आहेत. त्यापैकीच काही गुंड सर्रासपणे वाहनचालकांकडून एन्ट्रीच्या नावाखाली खंडणी उकळतात.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटक