शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या कर्मचाऱ्यांकडून शुल्क वसुली

By admin | Updated: February 3, 2017 02:31 IST

राज्यभरातील सर्व मेडिकल रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार दिला जातो.

मोफत उपचार सेवा बंद : कर्मचाऱ्यांमध्ये संतापनागपूर : राज्यभरातील सर्व मेडिकल रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार दिला जातो. परंतु नागपूर मेडिकलने डिसेंबर महिन्यापासून मोफत उपचार पद्धती बंद करून शुल्क आकारणे सुरू केले आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून कधीही उद्रेक होण्याची शक्यता आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विविध विभागात सुमारे ८०० कर्मचारी कार्यरत आहेत. मेडिकलच्या स्थापनेपासून या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार दिला जात होता. मल-मूत्र तपासणीपासून ते एक्स-रे, सिटी स्कॅन, ईसीजी किंवा वॉर्डाचे शुल्क भरावे लागत नव्हते. परंतु दरम्यानच्या काळात जे कर्मचारी नाहीत किंवा जे सेवेतून निवृत्त झाले आहेत ते खोटे दस्तावेज दाखवून याचा गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या. वैद्यकीय अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी डिसेंबर २०१६ पासून रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची उपचाराची मोफत सेवाच बंद केली. सुरुवातीला याचे पडसाद उमटले नाही. परंतु केवळ कर्मचाऱ्यांचीच सेवा बंद केली ही बाब सामोर येऊ लागल्याने त्यांच्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या मते, संसर्गजन्य परिस्थितीतही प्रामाणिकपणे आम्ही रुग्णसेवा करतो. परिणामी, कधीही कुठला आजार आम्हाला होऊ शकतो. अशावेळी मेडिकल जर आमच्या पाठिशी राहिले नाही तर आम्ही कुणाकडे मदत मागावी? मेडिकल प्रशासनाने घेतलेला हा तुघलकी निर्णय मागे घ्यावा, अशा आशयाचे पत्र नुकतेच अधिष्ठात्यांसह वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कर्मचाऱ्यांनी दिले आहे.(प्रतिनिधी)गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या वाढलीमेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे म्हणाले, शासकीय सेवेचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रुग्णालयाचे कर्मचारी नसताना काही जण याचा फायदा घेत होते. या संदर्भातील तक्रारी वाढल्याने शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु लवकरच यावर विशेष उपाययोजना करून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला जाईल, असेही ते म्हणाले.मेयोतही शुल्क आकारले जात नाहीविदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे (इंटक) अध्यक्ष त्रिक्षरण सहारे म्हणाले, राज्यात कुठेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांकडून उपचाराचे शुल्क घेतले जात नाही. नागपुरातीलच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेयो) हा नियम कायम आहे. असे असताना केवळ मेडिकलच्या कर्मचाऱ्यांकडून उपचारासाठी शुल्क आकारणे हे अन्यायकारक आहे. मेडिकल प्रशासनाने यावर विचार करावा, असेही ते म्हणाले.