शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एनव्हीसीसीच्या एलबीटी शिबिरात १४.५ लाखांची वसुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 21:46 IST

नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे (एनव्हीसीसी) सिव्हील लाईन्स येथील चेंबरच्या सभागृहात व्यापाऱ्यांसाठी आयोजित एलबीटी शिबिरात मनपा अधिकाऱ्यांना १४.५ लाख रुपयांची वसुली झाली. शिबिरात ४१० व्यापारी सहभागी झाले आणि ६६० प्रकरणांमध्ये ५५ अपिलांचा निपटारा करण्यात आला.

ठळक मुद्दे ६६० प्रकरणे, ५५ अपिलांचा निपटारा : चेंबर व मनपाचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे (एनव्हीसीसी) सिव्हील लाईन्स येथील चेंबरच्या सभागृहात व्यापाऱ्यांसाठी आयोजित एलबीटी शिबिरात मनपा अधिकाऱ्यांना १४.५ लाख रुपयांची वसुली झाली. शिबिरात ४१० व्यापारी सहभागी झाले आणि ६६० प्रकरणांमध्ये ५५ अपिलांचा निपटारा करण्यात आला. शिबिरात एलबीटी असेसमेंटसह अनेक व्यापाऱ्यांना अधिकाऱ्यांनी असेसमेंट आॅर्डर सोपविले.शिबिराच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी एनव्हीसीसीचे अध्यक्ष हेमंत गांधी होते. मंचावर मनपा स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, उपायुक्त राजेश मोहिते, सीए आरती कुळकर्णी, सहायक आयुक्त (एलबीटी) मिलिंद मेश्राम, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेवक निशांत गांधी, चेंबरचे अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष व एनव्हीसीसीचे माजी अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, सीएएमआयटीचे अध्यक्ष व चेंबरचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल, मयूर पंचमतिया, उपाध्यक्ष अर्जुनदास कुकरेजा, राजू व्यास, अश्विन मेहाडिया, सचिव संजय के. अग्रवाल, फारुखभाई अकबानी, रामअवतार तोतला, उमेश पटेल आणि जनसंपर्क अधिकारी शब्बार शाकीर उपस्थित होते.हेमंत गांधी यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी वीरेंद्र कुकरेजा, चेंबरचे पदाधिकारी आणि मनपाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन व्यापारी संघटनांसाठी चांगले संकेत आहेत. शिबिरात लाभ न मिळालेल्या व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे जाऊन प्रकरणांचा निपटारा करावा.कुकरेजा यांनी चेंबरचे आभार व्यक्त करीत एलबीटी प्रकरणांचा निपटारा करण्यात व्यापाऱ्यांचा सहयोग आणि शिबिराच्या यशस्वीतेसाठी मनपा अधिकाऱ्यांचे आभार मानले. व्यापाऱ्यांनी मनपात येऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. त्याकरिता अधिकारी सहकार्य करतील.मोहिते म्हणाले, भविष्यात मनपातर्फे व्यापाऱ्यांच्या सहकार्याने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. दीपेन अग्रवाल म्हणाले, भविष्यात व्यापाऱ्यांच्या हितासाठी अशा अनेक शिबिराचे आयोजन व्हावे.प्रारंभी मनपा अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरासाठी स्टील हार्डवेअर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजेश लखोटिया यांचे सहकार्य मिळाले. यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर