शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता तपासणीच्या नावाखाली वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:08 IST

नागपूर : जिल्हा परिषदेशी कुठलाही संबंध नसताना, सरकारच्या आदेशाचा हवाला देत एक संस्था जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या कामाची गुणवत्ता ...

नागपूर : जिल्हा परिषदेशी कुठलाही संबंध नसताना, सरकारच्या आदेशाचा हवाला देत एक संस्था जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या कामाची गुणवत्ता तपासणी करीत आहे. पण तपासणीच्या नावावर कंत्राटदाराकडून वसुली करण्यात येत असल्याची तक्रार कंत्राटदाराने केली आहे. जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच एक सामाजिक संस्था रस्ते, पुलाची गुणवत्ता तपासणी करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

न्यू अ‍ॅडव्हेंट आयक्यूआय फाऊंडेशन नावाने ही संस्था आहे. या संस्थेने जि.प.च्या लघु सिंचन विभागाच्या कामात गैरप्रकार झाला असल्याच्या तक्रारीचा हवाला देत, कामाची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी पत्र दिले होते. मुळात ही संस्था कुठली आहे. तिच्याकडे कायदेशीर दस्तावेज आहे का? आतापर्यंत किती कामाची संस्थेने गुणवत्ता तपासणी केली. मुख्यत्वे संस्था अस्तित्वात आहे का? यासंदर्भात कुठलीही चौकशी न करता विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी त्याला परवानगी दिली. या संस्थेचे सदस्य कंत्राटदाराकडून करण्यात आलेल्या रिधोरा, तेलकामठी येथील साईटवर पोहचले, मोजमापही केले. कंत्राटदाराने त्यांच्याकडून गुणवत्ता तपासणीसाठी कागदपत्रांची मागणी केली. त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नव्हती. कंत्राटदाराने आरोप केला की, संस्थेचे सदस्य गुणवत्ता तपासणीच्या नावावर वसुली करीत आहेत. यासंदर्भात कंत्राटदाराने पोलीस व आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली आहे.

- चुकीचे काम होत असेल तर कारवाई करू

यासंदर्भात जि.प. अध्यक्ष व जलव्यवस्थापन समितीच्या सभापती रश्मी बर्वे यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की कार्यकारी अभियंत्याने त्यांना परवानगी दिली. मात्र ही संस्था जर गुणवत्ता तपासणीच्या नावावर चुकीचे काम करीत असेल तर नक्कीच कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर कार्यकारी अभियंत्याने कुठल्या आधारावर गुणवत्ता तपासणीची परवानगी दिली, याचीही माहिती घेण्यात येईल.