शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

सर्वात मोठ्या राखीचा विक्रम

By admin | Updated: August 30, 2015 02:56 IST

मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज यांनी रक्षाबंधनाच्या पर्वावर सांगितले की, सर्व नागरिक आपापल्या धर्माला श्रेष्ठ म्हणतात.

नागपूर : मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज यांनी रक्षाबंधनाच्या पर्वावर सांगितले की, सर्व नागरिक आपापल्या धर्माला श्रेष्ठ म्हणतात. परंतु प्रत्यक्षात मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. रक्षाबंधनाचा सण मैत्री आणि मानवतेचा संदेश देतो. रक्षाबंधनानिमित्त आज जगातील सर्वात मोठी ७२१ फुटांची राखी अंतर्मना मुनिश्री प्रसन्नसागरजी यांना समर्पित करण्यात आली.पावन वर्षायोग समितीच्यावतीने या भव्य राखीचा समर्पण समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला. यात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. या राखीची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्मध्ये करण्यात आली आहे. ही नोंद घेणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधींनी नागरिकांसमोर या बाबीची पुष्टी केली आहे. मुनिश्रींच्या चातुर्मासाचे विशेष आकर्षण ठरलेल्या या ७२१ फूट लांबीच्या राखीची नागरिकांनी उत्सुकतेने पाहणी केली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर आचार्यश्री पूणचंद्र सुरीश्वरजी महाराज, मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज, मुनिश्री पीयूषसागरजी महाराज, मुनिश्री गिरनारसागरजी महाराज, मुनिश्री प्रज्ञासागरजी महाराज, संस्कार सागरजी महाराज आणि क्षुल्लकजी उपस्थित होते. कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, नासुप्रचे सभापती शाम वर्धने, सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, नगरसेविका आभा पांडे, नगरसेवक प्रशांत धवड उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ राखीचे सौभाग्यशाली श्रावक स्वरुपाबेन अमरचंद मेहता आणि मनीष मेहता परिवाराच्या हस्ते ध्वजारोहण करून झाला. यावेळी चातुर्मास समितीचे अध्यक्ष नरेश पाटणी, कार्याध्यक्ष राकेश पाटणी, संयोजक प्रकाश बोहरा, महामंत्री पंकज बोहरा, संतोष पेंढारी, सतीश पेंढारी, सुनील पेंढारी, अमित बडजाते, राजेश सरावगी, नितीन महाजन उपस्थित होते. भगवान महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. (प्रतिनिधी)