शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 20:24 IST

Corona death, PIL कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा आणि येणाऱ्या काळात कोरोना रुग्ण दगावू नये याकरिता त्यांना प्रभावी वैद्यकीय उपचार व सुविधा पुरविण्यात याव्या, अशा विनंतीसह जनार्दन मून व इतर चार सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देपाच सामाजिक कार्यकर्त्यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा आणि येणाऱ्या काळात कोरोना रुग्ण दगावू नये याकरिता त्यांना प्रभावी वैद्यकीय उपचार व सुविधा पुरविण्यात याव्या, अशा विनंतीसह जनार्दन मून व इतर चार सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

राज्यघटनेतील तरतुदीनुसार नागरिकांच्या प्राणाचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु, देशातील केंद्र सरकार व राज्य सरकार हे दोघेही नागरिकांना कोरोना संक्रमणापासून वाचविण्यात अपयशी ठरले आहेत. कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असून कोरोना रुग्णांना वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. जीवनरक्षक औषधे व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृतांना न्याय मिळण्यासाठी जबाबदार व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकेत केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव, राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव, नागपूर महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. अश्विन इंगोले कामकाज पाहणार आहेत.

घरोघरी जाऊन लसीकरण करावे

कोरोना संक्रमण थोपविण्यासाठी सरकारने नागरिकांना घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचणे आणि त्यांची ॲन्टिजेन व आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु, सरकार तसे न करता नागरिकांना ठराविक ठिकाणी बोलवत आहे. परिणामी, कोरोना संक्रमण वाढत आहे. याशिवाय अनेक डॉक्टर कोरोना उपचार नियमांचे पालन करीत नाही. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही असामाजिक तत्त्व आर्थिक लाभासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहे. तसेच, राज्यातील खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त घेतलेले ३६ लाख १७ हजार २८० रुपये सरकारने अद्याप वसूल करून दिले नाही, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या