शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचे सर्व दस्तावेज रेकॉर्डवर आणा; उच्च न्यायालयाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 20:48 IST

नागपूरमध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनच्या अंमलबजावणीकरिता वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या प्रती व अन्य दस्तावेज रेकॉर्डवर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित याचिकाकर्ते व प्रतिवादींना दिले आहेत.

ठळक मुद्देमंगळवारपर्यंत वेळ देण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : नागपूरमध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनच्या अंमलबजावणीकरिता वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या प्रती व अन्य दस्तावेज रेकॉर्डवर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित याचिकाकर्ते व प्रतिवादींना दिले आहेत. याकरिता त्यांना मंगळवारपर्यंत वेळ देण्यात आला आहे.महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना संक्रमण रोखण्याच्या उद्देशाने ३ व ४ मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनांच्या वैधतेला अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, अ‍ॅड. कमल सतुजा, अ‍ॅड. मनोज साबळे व अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मनपा आयुक्तांनी वादग्रस्त अधिसूचनांद्वारे लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक वस्तूंसह अन्य काही दुकाने सुरू करण्याची मुभा दिली आहे. त्यात खासगी कार्यालये आणि दारुसह अन्य अनेक प्रकारच्या दुकानांचा समावेश नव्हता. त्यानंतर ही याचिका प्रलंबित असताना मनपा आयुक्तांनी आणखी काही नवीन आदेश जारी केले. परिणामी, न्यायालयाने वरील निर्देश दिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय