शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

१० हजारावर जागांची शिफारस

By admin | Updated: April 8, 2016 03:03 IST

‘एमसीआय’ (मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया)ने २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना एम.बी.बी.एस.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये : ‘एमसीआय’ने दिली गतवर्षीची आकडेवारीनागपूर : ‘एमसीआय’ (मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया)ने २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या १० हजार ७२२ नवीन जागा मंजूर करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे केली होती तर, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ६ हजार ७६० नवीन जागांची शिफारस करण्यात आली होती. ‘एमसीआय’चे विधी अधिकारी शिखर रंजन यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून २०१५-१६ शैक्षणिक सत्रात शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या बाबतीत विविध विषयांवर घेण्यात आलेल्या निर्णयाची तुलनात्मक आकडेवारी सादर केली. त्यात वरील माहिती देण्यात आली. या सत्रात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३९ तर, खासगी महाविद्यालयासाठी ५४ अर्ज आले होते. केंद्र शासनाने ‘एमसीआय’च्या शिफारसीनंतर ११ शासकीय तर, ६ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी दिली. नवीन तुकडी प्रवेशाला परवानगी मिळण्यासाठी ३८ शासकीय तर, ४५ खासगी महाविद्यालयांनी अर्ज केले होते. यापैकी ३८ शासकीय तर, २१ खासगी महाविद्यालयांना नवीन तुकडीची परवानगी देण्यात आली असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. १७ मार्च २०१६ रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यावर्षी केंद्र शासनाकडे किती वैद्यकीय महाविद्यालयांविषयी नकारात्मक व किती वैद्यकीय महाविद्यालयांविषयी सकारात्मक शिफारस करण्यात आली अशी विचारणा न्यायालयाने आदेशात करून खासगी व शासकीय महाविद्यालयांची वेगवेगळी आकडेवारी मागितली होती. परंतु, ‘एमसीआय’ने यावर्षीची आकडेवारी उपलब्ध नसल्याने गेल्यावर्षीची माहिती सादर केली. यासंदर्भात केंद्र शासनाला शिफारस पाठविण्याची शेवटची तारीख १५ मे आहे. सध्या महाविद्यालयांचे अर्ज विचाराधीन असल्यामुळे २०१६-१७ शैक्षणिक सत्रातील संपूर्ण आकडेवारी १५ मे नंतरच उपलब्ध होऊ शकेल असे स्पष्टीकरण ‘एमसीआय’ने दिले आहे.(प्रतिनिधी)काय आहे मूळ प्रकरण‘एमसीआय’ने यावर्षी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात केंद्र शासनाकडे नकारात्मक शिफारस केली आहे. ‘एमसीआय’च्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे निरीक्षण करून विविध त्रुटी काढल्या आहेत. परिणामी या महाविद्यालयात आगामी शैक्षणिक सत्रात नवीन तुकडीला प्रवेश देण्याची प्रक्रिया धोक्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने १७ मार्च २०१६ रोजीचा आदेश दिला होता. यासंदर्भात प्रकाश इटनकर (गडचिरोली) व रामदास वागदरकर (चंद्रपूर) यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.