शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

रिअ‍ॅलिटी चेक : रांगेत उभे असूनही चाचणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 9:46 PM

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले, कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तातडीने चाचणी करणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयात यासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात असल्याने सर्वसामान्यांना चाचणी करता यावी यासाठी महापालिकेने झोननिहाय ३४ कोविड चाचणी केंद्र सुरू केले आहेत. सकाळी १० ते दुपारी २ अशी चाचणीची वेळ निश्चित केली आहे. परंतु या निर्धारित वेळेत तपासणीसाठी रांगेत लागलेल्या लोकांना परत पाठविले जाते. काही केंद्रांवर ५० रुग्णांची तपासणी केली की काम बंद होत असल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

ठळक मुद्दे मनपाच्या कोविड चाचणी केंद्रांवर गोंधळआरोग्य विभागात नियोजनाचा अभाव गर्दीमुळे संसर्गाचा धोका वाढलानिर्धारित वेळेत आलेल्यांचीही तपासणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले, कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तातडीने चाचणी करणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयात यासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात असल्याने सर्वसामान्यांना चाचणी करता यावी यासाठी महापालिकेने झोननिहाय ३४ कोविड चाचणी केंद्र सुरू केले आहेत. सकाळी १० ते दुपारी २ अशी चाचणीची वेळ निश्चित केली आहे. परंतु या निर्धारित वेळेत तपासणीसाठी रांगेत लागलेल्या लोकांना परत पाठविले जाते. काही केंद्रांवर ५० रुग्णांची तपासणी केली की काम बंद होत असल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो.काही केंद्रावर तपासणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिपोर्टसाठी बोलावले जाते. दुसरीकडे केंद्रावरील गर्दीमुळे संसर्गाचा धोका असल्याने चाचणीसाठी येणाऱ्यांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण आहे.सूचना व माहिती फलक नसल्याने संभ्रमकेंद्रावर नेमक्या किती लोकांची तपासणी केली जाणार,किती लोकांना तपासणीसाठी टोकन दिले. रांगेत उभे राहिल्यानंतर चाचणी होईल की नाही. चाचणीचा अहवाल कधी मिळणार याबाबत कुठल्याही स्वरूपाची माहिती मिळत नसल्याने केंद्रावर गोंधळाचे वातावरण आहे.तपासणी केंद्रांचा आढावा घेणार- आयुक्तनिर्धारित वेळेत तपासणी केंद्रावर पोहोचलेल्या व्यक्तींची तपासणी झाली पाहिजे. केंद्राची क्षमता किती आहे. किती लोकांना टोकन दिले त्याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे. टेस्टिंग सेंटरचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.अशी आहेत चाचणी केंद्रसहा केंद्रावर आर.टी.-पीसीआर चाचणीची व्यवस्था यात प्रशिक्षण केंद्र (आर.पी.टी.एस.), लॉ कॉलेज वसतिगृह, रविभवन, मॉरिस कॉलेज वसतिगृह, पाचपावली पोलीस वसाहत आणि राजनगर आदींचा समावेश आहे. अ‍ॅन्टिजन चाचणीची व्यवस्था २८ केंद्रावर आहे. यात जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र, फुटाळा, तेलंगखेडी, हजारी पहाड प्राथमिक आरोग्य केंद्र, बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र, नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र, बिडीपेठ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, जागनाथ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, शांतिनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, डिप्टी सिग्नल प्राथमिक आरोग्य केंद्र, पारडी प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, झिंगाबाई टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र, हुडकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र, नरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, सोमलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, नारा प्राथमिक आरोग्य केंद्र, कपिल नगर प्राथमिक आरोग्य केंद्र, मेहंदीबाग प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंडेनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, डायग्नोस्टिक सेंटर महाल प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासी बॉईज होस्टेल कळमना, कॉटन मार्केट प्राथमिक आरोग्य केंद्र, के.टी. नगर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.