मुख्यमंत्री फडणवीस : कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञांच्या परिषदेचे उद्घाटननागपूर : सुदृढ आरोग्य असणारा देश अधिक प्रगती करू शकतो. अशावेळी आरोग्य संबंधीच्या परिषदांमधून होणाऱ्या ज्ञानाची देवाण-घेवाण महत्त्वाची ठरते. यातून जगात होत असलेल्या विविध संशोधनाची माहिती मिळते. या संशोधनाचा फायदा दुर्बल घटकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले. विद्या शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संचालित दंतरोग आणि संशोधन केंद्रातर्फे१७ व्या राष्ट्रीय पदव्युत्तर कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञांच्या परिषदेचे नागपूर येथील डिगडोह येथे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून क्रि ष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेदप्रकाश मिश्रा, नवी दिल्ली येथील मौलाना आझाद दंतरोग संस्थेचे संचालक पद्मश्री डॉ. महेश वर्मा, भारतीय कृत्रिम दंत शास्त्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सी.एल. सतीश बाबू, डॉ.व्ही रंगराजन, विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री रणजित देशमुख, आमदार आशिष देशमुख, डॉ. शाम गुंडावार, डॉ. के. महेंद्रनाथ रेड्डी, डॉ. हिंमाशु एरण, उपस्थित होते.संमेलनाच्या संयोजक अध्यक्षा डॉ. उषा रडके उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिकीकरणामुळे ज्ञानाच्या कक्षा रु ंदावत चालल्या आहेत. परिणामी, आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होऊ घातल्या आहेत. असे असतानाही बहुतांश भागात जन्माला येणारी बालके कुपोषित आहे. कर्करोगाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: मध्य भारतात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हे थांबविण्यासाठी वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांनी प्रतिबंधात्मक उपाय सुचवावे, असेही ते म्हणाले. डॉ. मिश्रा म्हणाले, जागतिक आव्हानला सामोरे जाण्यासाठी दर्जेदार आरोग्य शिक्षण देण्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. आरोग्य धोरणाच्या संदर्भात निर्णय घेणाऱ्या शासनाने वैद्यकीय संस्थांमध्ये कालानुरु प बदल करण्याची जबाबदारी निश्चित करावी. यामुळे समाजाला आरोग्याच्या नवीन तंत्राचा तातडीने फायदा होऊ शकेल. त्यांनी पीजीच्या विद्यार्थ्यांना विशेषज्ञ होण्याचे, शिक्षक होण्याचे आणि नवनवीन संशोधन करण्याचे आवाहनही केले. यावेळी डॉ. महेश वर्मा, डॉ.रंगराजन, डॉ.सी.एल.सतीश बाबू यांनी परिषदेत होणाऱ्या विविध चर्चासत्रावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक परिषदेच्या संयोजिका डॉ. उषा रडके यानी तर स्वागतपर भाषण रणजित देशमुख यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.या परिषदेत देशभरातून २०३ दंत महाविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेस के.महेद्र नाथ रेड्डी, डॉ. हिंमाशु आर्य मार्गदर्शन करणार आहेत. (प्रतिनिधी)
संशोधनाचा फायदा दुर्बल घटकांपर्यंत पोहचवा
By admin | Updated: July 11, 2015 03:01 IST