शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

दरदिवशी २०० घरांपर्यंत पोहचा

By admin | Updated: May 30, 2017 01:56 IST

‘मिशन २०१९’ डोळ््यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाकडून पावले उचलली जात असून सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या मुद्यावर विशेष बैठक घेतली.

अमित शाह यांची सूचना : भाजपाच्या ‘कोअर’ समितीची घेतली बैठकलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मिशन २०१९’ डोळ््यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाकडून पावले उचलली जात असून सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या मुद्यावर विशेष बैठक घेतली. या बैठकीत शहरातील आमदार, पक्षाचे संघटनमंत्री व ‘कोअर’ समितीचे सदस्य सहभागी होते. पक्षाच्या विस्तारक योजनेअंतर्गत १५ जूनपर्यंत बूथनिहाय दरदिवशी २०० घरांपर्यंत पदाधिकाऱ्यांनी पोहोचावे व केंद्राच्या विविध योजना, पक्षांची धोरणे याबाबत जागृती करावी, असे ‘टार्गेट’च शाह यांनी दिले.देशभरात भाजपाचा विस्तार व्हावा यासाठी अमित शाह ११० शहरांच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी दुपारी १२.३० वाजता नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर शाह थेट रविभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.अजय संचेती, शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांच्यासह शहरातील सर्व आमदार, पक्षाचे महामंत्री, संघटनमंत्री उपस्थित होते. यावेळी माजी महापौर प्रवीण दटके यांनी भाजपाने नागपूर शहरात केलेल्या कार्यविस्ताराबाबत विस्तृत माहिती सादर केली. त्यानंतर शाह यांनी विस्तारक योजनेच्या तयारीसंदर्भात पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. सोबतच कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या इत्यादीबाबतदेखील त्यांनी विचारणा केली. बूथ विस्तारकांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत संपर्क साधण्यात येणार आहे. प्रभाग पातळीवर पक्षाला आणखी मजबुती मिळावी व कार्यकर्त्यांचे ‘नेटवर्क’ आणखी मजबूत व्हावे यासाठी या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजेत. प्रत्येक ‘बूथ’वर १५ दिवसांत दररोज किमान २०० घरांपर्यंत पोहोचलेच पाहिजे, अशी सूचनाच शाह यांनी केली. या योजनेअंतर्गत मतदारांना सरकारचे काम, विविध योजना तसेच पक्षाची भूमिका याबाबत सखोल माहिती दिली गेली पाहिजे. यासाठी प्रचारसाहित्य, पत्रके यांचे वाटपदेखील करण्यात यावे, असे शाह यावेळी म्हणाले. बूथ विस्तारकांच्या प्रशिक्षणाबाबतदेखील शाह यांनी यावेळी जाणून घेतले. दरम्यान, या बैठकीनंतर दुपारी ३.३० च्या सुमारास आ.अनिल सोले यांनी शाह यांची भेट घेतली. सोले यांनी शाह यांना ‘फॉर्च्युन फाऊंडेशन’ तसेच ‘ग्रीन अर्थ फाऊंडेशन’च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत माहिती दिली.भाजपाचे ‘मिशन ४००’२०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपाकडून किमान ४०० जागांवर विजय मिळविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ही बाब डोळ्यासमोर ठेवून बूथपातळीवर संघटना मजबूत करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसोबतच चर्चा करून स्थानिक पातळीवर योजना आखली पाहिजे. कुठलीही गोष्ट करताना कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या. कार्यकर्तेच पक्षाचा आधारस्तंभ आहेत. पक्षातील जुनेजाणते व वरिष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्क साधा, असे शाह यांनी यावेळी ‘कोअर’ समितीच्या सदस्यांना सांगितले. १६ ते १८ जून या कालावधीत शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर परत येणार आहेत. यावेळी बूथ विस्तारक योजनेचा सविस्तर अहवाल मांडण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.