शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कस्तूरचंद पार्कवरच रावण दहन, हेरिटेज कमिटीने दिली चार अटींवर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:36 IST

शहरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हेरीटेज कमिटीने चार अटी घालून परवानगी दिली आहे. यामुळे गेल्या ६५ वर्षांपासून येथे आयोजित होणारा दसरा उत्सव या वर्षीही आयोजित  करता येणार आहे.  हेरीटेज कमिटीची बैठक मंगळवारी महापालिकेत झाली.

नागपूर, दि. 5 - शहरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हेरीटेज कमिटीने चार अटी घालून परवानगी दिली आहे. यामुळे गेल्या ६५ वर्षांपासून येथे आयोजित होणारा दसरा उत्सव या वर्षीही आयोजित  करता येणार आहे.  हेरीटेज कमिटीची बैठक मंगळवारी महापालिकेत झाली. अध्यक्षस्थानी नीरी चे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती होते. कमिटीचे सदस्य पी.एस. पाटनकर, उज्ज्वला चक्रदेव, सुप्रिया थूल, अशोक मोखा यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होेते. हेरिटेज कमिटीने कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाची परवानगी देताना आयोजकांना चार अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे बंधन घातले. कमिटीचे सदस्य अशोक मोखा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, हेरीटेज कमिटी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विरोधात नाही.  सांस्कृतिक कार्यक्रम देखील हेरिटेजचाच एक भाग आहे, असे आमचे मानने आहे. विशेषत: जे सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या अनेक वर्षाापासून सुरू आहेत व ते शहराची ऐतिहासिक परंपरा बनले आहेत, अशा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मार्ग काढण्याचीच कमिटीची भूमिका आहे. कमिटीने रावण दहनाची परवानगी दिली. आता आयोजकांनी अटींचे पालन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  

अशा आहेत अटी

- कस्तूरचंद पार्कच्या मध्य भागात असलेले स्मारक ज्याला बारादरी असे संबोधले जाते, ते जीर्ण होत आहे. त्यामुळे या कुणी स्पर्श करू नये याची काळजी घ्यावी. यासाठी या स्मारकापासून २० फूट अंतरावर  सुरक्षा कवच उभारावे लागेल. 

- कार्यक्रमाच्या आयोजनावेळी केवळ दुचाकींनाच प्रवेश दिला जाईल.  चारचाकी वाहनांमुळे मैदानातील माती खालवर होते व त्यामुळे मैदानाचे नुकसान होते. 

- या स्मारकापासून रावणाचा पुतळा शक्य तेवढ्या लांब असावा तसेच पुतळ्याची उंची स्मारकाच्या किमान दुप्पट असावी. त्यामुळे पुतळ्याचे दहन करताना स्मारकाला नुकसान होणार नाही. 

- अशा आयोजनांमध्ये आतिषबाजी केली जाते. यामुळे प्रदूषण होते. पर्यावरणाचे होणारे हे नुकसान भरून काढण्यासाठी आयोजक सनातन धर्म ययुवक सभेला  कस्तूरचंद पार्कमध्ये वृक्षारोपण करून वर्षभर जतन करावे लागेस. विशेष म्हणजे त्यांनी लावलेले रोपे पुढील वर्षांपर्यंत जगणे आवश्यक आहे.