शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांच्या संपाचा शिधापत्रिकाधारकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 21:27 IST

रेशन दुकानदारांच्या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने रेशन दुकानदार संघटनेने १ जूनपासून संप पुकारला आहे. दुकानदारांनी रेशन वाटप बंद केले आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रेशन वाटपास सुरुवात होते. परंतु दुकानेच बंद असल्याने त्याचा फटका शिधापत्रिकाधारकांना बसतो आहे.

ठळक मुद्देदुकाने सुरू, वितरण बंद : दुकानात येऊन परत जातात शिधापत्रिकाधारक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशन दुकानदारांच्या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने रेशन दुकानदार संघटनेने १ जूनपासून संप पुकारला आहे. दुकानदारांनी रेशन वाटप बंद केले आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रेशन वाटपास सुरुवात होते. परंतु दुकानेच बंद असल्याने त्याचा फटका शिधापत्रिकाधारकांना बसतो आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने गेल्या अडीच महिन्यापासून देशात लॉकडाऊन केले होते. यामुळे अनेकांचे रोजगार ठप्प पडल्याने रेशनवरील धान्य फार मदतीचे ठरले. अशा संकटाच्या परिस्थितीत कुणीही गरीब उपाशी राहू नये म्हणून रेशन दुकानदारही आपला जीव संकटात घालून कार्यरत होते. परंतु शासनाकडून त्यांची दखलही घेतल्या गेली नाही, अशी खंत व्यक्त करुन आम्हालाही ‘कोविड योद्धा’ म्हणून घोषित करा यासह प्रत्येक रेशन दुकानदाराचा ५० लाख रुपयांचा विमा काढा, अशा विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी संप पुकारला. रेशन दुकानदारांच्या मागण्या शासनाला मान्य नसल्याने, शासनाने त्यांच्या मागण्यांसंदर्भात अजूनही ठोस निर्णय घेतला नाही. जून महिन्याचा धान्याचा पुरवठा दुकानांमध्ये पोहचला असून, दुकानदारांनी जूनचे धान्य वितरण करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गरीब शिधापत्रिकाधारकांचे चांगलेच वांधे झाले आहेत.रेशन दुकानदारांच्या संपाबाबत शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अनिल सवई यांना विचारले असता, ते म्हणाले की, रेशन दुकानांमध्ये शासनाकडून धान्य पुरवठा सुरू आहे आणि शिधापत्रिका धारकांनाही धान्याचे वितरण करण्यात येत आहे.दुकाने सुरू असली तरी, जोवर शासन रेशन दुकानदारांना विमा सुरक्षा देत नाही, तोवर धान्य वितरण करणार नाही.संजय पाटील, अध्यक्ष, विदर्भ रास्तभाव केरोसीन विक्रेता संघटना

टॅग्स :Strikeसंपfoodअन्न