शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील बोखारा येथे झाडाखालीच भरते रेशन दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 11:01 IST

कोरडीजवळील बोखारा वसाहतीतील स्वस्त धान्याची विक्री, वाटप चक्क झाडाखाली केले जात असून कित्येक महिन्यांपासून लाभधारक उन्हाळा-पावसाळ्याच्या दिवसात वेदना सहन करीत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली.

ठळक मुद्देउन्हाळ्यात उकाडा तर पावसाळ्यात पावसाचा त्रास

दिनकर ठवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरडीजवळील बोखारा वसाहतीतील स्वस्त धान्याची विक्री, वाटप चक्क झाडाखाली केले जात असून कित्येक महिन्यांपासून लाभधारक उन्हाळा-पावसाळ्याच्या दिवसात वेदना सहन करीत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली. मोजक्याच दिवशी स्वस्त धान्याचे वाटप केले जात असल्याने जागेअभावी लाभधारकांना ताटकळत तासन्तास उभेच राहावे लागते. रेशन दुकानदार कसेबसे झाडाखाली आपले कार्यालय थाटतात. याच ठिकाणी धान्य वाटप केले जाते. स्थानिक दुकानदार नसल्याने होणारी गैरसोयदेखील लाभधारकांना सहन करावा लागत आहे. ही बोखारा येथील रेशन लाभधारकांची व्यथा आहे. आश्चर्य म्हणजे, पुरवठा विभागाने या व्यथेची अद्यापही दखल घेतलेली नाही.बोखारा येथील रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य पुरविण्याची जबाबदारी गोधनी येथील राऊत नावाच्या रेशन दुकानधारकाकडे होती. काही महिन्यांपूर्वी राऊत यांना धान्य वाटपाच्या गैरव्यवहारावरून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर बोखारा येथील स्वस्त धान्य वाटपाची जबाबदारी लोणारा येथील स्वस्त धान्य दुकानधारक ताराचंद कापसे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.धान्याच्या अफरातफरीच्या कारवाईनंतर धान्य वाटपाची जबाबदारी ताराचंद कापसे यांच्याकडे आली. बोखाऱ्यात सोईस्कर जागाच मिळत नसल्याचे कापसे यांचे म्हणणे आहे.त्यांनी गावाच्या बाहेर शेतात असलेली एक खोली धान्य साठविण्यासाठी घेतली. यात शेतात असलेल्या एका झाडाखाली खुर्च्या टाकून तात्पुरते कार्यालय थाटले जाते. याचठिकाणी तासन्तास प्रतीक्षा करीत लाभधारक उभे असतात. कापसे यांच्याकडे बोखाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते केवळ आठवड्यातून दोनच दिवस धान्य वाटप करतात. त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी दिसून येते. ठराविक दिवशी लाभधारकांना आपली मजुरी गमावून रेशन धान्याची प्रतीक्षा करावी लागते.

टॅग्स :Governmentसरकार