शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकाधारकांना आता डाळही मिळणार फुकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 21:43 IST

रेशन दुकानातून डाळ गायब झाल्याची ओरड होत असताना, केंद्र सरकार आता शिधापत्रिकाधारकांना डाळ नि:शुल्क देणार आहे. नि:शुल्क डाळीचा पुरवठा रेशन दुकानात झाला असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ५ किलो प्रति व्यक्ती तांदूळ नि:शुल्क देण्याबरोबरच प्रत्येक कार्डवर १ किलो डाळही नि:शुल्क मिळणार आहे.

ठळक मुद्देबीपीएल, प्राधान्य गट, अंत्योदय गटातील शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशन दुकानातून डाळ गायब झाल्याची ओरड होत असताना, केंद्र सरकार आता शिधापत्रिकाधारकांना डाळ नि:शुल्क देणार आहे. नि:शुल्क डाळीचा पुरवठा रेशन दुकानात झाला असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ५ किलो प्रति व्यक्ती तांदूळ नि:शुल्क देण्याबरोबरच प्रत्येक कार्डवर १ किलो डाळही नि:शुल्क मिळणार आहे.केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत १ एप्रिलपासून प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यातील बीपीएल, अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना १७ हजार ९६७.६ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. पण मे महिन्याच्या पुरवठ्यात शासनाकडून रेशन दुकानांना गहू व तांदूळ पुरवठा झाला, डाळ मात्र देण्यात आली नाही, त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना डाळ मिळत नसल्याची ओरड होत होती. पण यासंदर्भात विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत केंद्र सरकार डाळही नि:शुल्क देणार आहे. नागपूर शहरात ६ झोन आहे. यातील ३ झोनमध्ये तूरडाळ व ३ झोनमध्ये चना डाळ उपलब्ध झाली आहे. शिधापत्रिकाधारकांना ही डाळ नि:शुल्क देण्यात येणार आहे. ज्या झोनमध्ये यंदा चना डाळ आली, पुढच्या महिन्यात त्या झोनला तूरडाळ उपलब्ध होणार आहे.नागपूर शहरात एकूण ६६५ रेशन दुकाने असून, ३ लाखांवर कार्डधारक आहेत. ५५ रुपये किलोप्रमाणे रेशन दुकानात केशरी व बीपीएल कार्डधारकांना एक किलो तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येते. शहराला महिन्याला ६६७ मेट्रिक टन डाळीची गरज असते.सरकारने या महिन्यात डाळीचे पैसे घेतलेले नाहीत. मात्र डाळीचा पुरवठा केला. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना डाळ नि:शुल्क द्यायची आहे. प्रति व्यक्ती ५ किलो नि:शुल्क तांदळासोबत प्रति कार्डधारकांना १ किलो तूरडाळ नि:शुल्क मिळणार आहे. त्यामुळे कार्डधारकांनी डाळीचे पैसे रेशन दुकानदारांना देऊ नयेत व रेशन दुकानदारांनी डाळीचे पैसे कार्डधारकांकडून घेऊ नये.संजय पाटील, अध्यक्ष, विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटना

टॅग्स :Governmentसरकारfoodअन्न