शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९३ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST

नागपूर : कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे युरोपमध्ये खळबळ उडाली असताना नागपूर जिल्ह्यात मात्र दिवसागणिक कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ...

नागपूर : कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे युरोपमध्ये खळबळ उडाली असताना नागपूर जिल्ह्यात मात्र दिवसागणिक कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सध्या हे प्रमाण ९३.४६ टक्क्यांवर गेले आहे. शुक्रवारी ३२० नवे बाधित रुग्ण आढळून आले तर ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १२१६६६ झाली असून मृतांची संख्या ३८८४ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत अधिक, ३९८ रुग्ण बरे झाले.

नागपूर जिल्ह्यात चाचण्यांची संख्या व रुग्णांची संख्या स्थिर असल्याचे दिसून येत आहे. मागील सहा दिवसात ४०००ते ४५०० दरम्यान चाचण्या झाल्या तर, ४५० ते ३५० दरम्यान रुग्णांची संख्या नोंदविण्यात आली. आज ३८४६ आरटीपीसीआर व ४४२ रॅपीड अँटिजेन अशी एकूण ४२८८ संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २७१, ग्रामीणमधील ४६ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीण मधील १ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ११३७०५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, ऑक्टोबर महिन्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९४ टक्क्यांवर पोहचले होते. डिसेंबर महिन्याच्या तीन आठवड्यात हे प्रमाण ९१ टक्क्यांवर आले होते. आता पुन्हा ते ९३ टक्क्यांवर गेले आहे. सध्या नागपुरात ४०७७ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील १२८२ रुग्ण रुग्णालयात तर २७९५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.

-विदेशातून परतलेल्या चार प्रवाशांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन

मध्य पूर्व येथून प्रवास केलेले चार प्रवासी शुक्रवारी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले. खबरदारीचे उपाय म्हणून त्यांना अल झमझम हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगीकरण म्हणजे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले. आजपासून पाच ते सातव्या दिवसाच्या दरम्यान या चौघांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. अहवाल निगेटिव्ह आल्यास होम क्वारंटाईन केले जाईल. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास मेडिकलमधील स्वतंत्र कक्षात ठेवले जाईल.

कोरोनाची आजची स्थिती

संशयित रुग्ण-४२८८

बाधित रुग्ण- १२१६६६

बरे झालेले रुग्ण-११३७०५

उपचाराखाली रुग्ण-४०७७

मृत्यू-३८८४