शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा वाढला ‘स्ट्रेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 11:32 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांतील प्राध्यापकांची पदे तर मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत.

ठळक मुद्देगट ‘अ’ व ‘ब’ प्रवर्गातील ७५ टक्के पदे रिक्तकसे मिळणार पहिल्या शंभरात ‘रँकिंग’?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांतील प्राध्यापकांची पदे तर मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेतच. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदेदेखील रिक्त आहेत. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवरदेखील कामाचा ताण जास्त वाढलेला आहे. गट ‘अ’ व ‘ब’ प्रवर्गातील अधिकाऱ्यांची तर ७५ टक्के पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत या वर्षी होणाऱ्या ‘नॅक’च्या मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी व ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क) पहिल्या शंभरात स्थान कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. विद्यापीठात गट ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ संवर्गातील किती पदे रिक्त आहेत, यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नागपूर विद्यापीठात कर्मचारी व अधिकारी मिळून एकूण ३८ टक्के पदे रिक्त आहेत. अनेक विभागात तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जात आहे. ‘अ’ प्रवर्गातील ६० पैकी ४१ पदे रिक्त आहेत. तर ‘ब’ प्रवर्गातील ५२ पैकी ४३ पदे रिक्त आहेत. दोन्ही प्रवर्गातील रिक्त पदांची टक्केवारी अनुक्रमे ६८.३३ व ८२.६९ टक्के इतकी आहे. ‘क’ प्रवर्गात ४७६ मंजूर पदे असून त्यातील १५८ पदे रिक्त आहेत. तर ‘ड’ प्रवर्गात २७६ पदांपैकी ८९ पदे रिक्त आहेत.

राज्य शासनाकडून हिरवा ‘सिग्नल’ नाहीविविध विभागांतील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. एकूण मंजूर पदांपैकी सुमारे ३८ टक्के पदे रिक्त आहेत. राज्य शासनाकडून पदभरतीला अद्यापही हिरवा ‘सिग्नल’ मिळालेला नाही. नागपूर विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकांची पदभरती झालेली नाही. दुसरीकडे दरवर्षी विविध विभागांतील कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. याचा फटका विभागांमधील प्रशासकीय प्रणालीला बसतो आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तर कामाचा विशेष ताण आहे. परीक्षा विभागात तर अनेकदा कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत आहे.

५० टक्के संवैधानिक पदेदेखील रिक्तनागपूर विद्यापीठात कुलगुरू-प्र-कुलगुरूंसह एकूण १४ संवैधानिक पदे आहेत. यापैकी ७ पदांवर पूर्णवेळ अधिकारी नाहीत. यात प्र-कुलगुरू, कुलसचिव, चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक या पदांचा समावेश आहे. दुसरीकडे बगैर सुटीची १८ शैक्षणिक पदे आहेत. यातील ९ म्हणजे ५० टक्के पदे रिक्त आहेत.

विद्यापीठाचा दर्जा वाढणार कसा ?या वर्षी ‘नॅक’चे मूल्यांकन होणार आहे. ‘नॅक’मध्ये ‘ए प्लस’ श्रेणी मिळविण्यासाठी विद्यापीठाला बरीच मेहनत करावी लागणार आहे. यात रिक्त जागांची संख्या डोकेदुखी ठरू शकते. दुसरीकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ‘रँकिंग फ्रेमवर्क’ जाहीर करणाऱ्या ‘रँकिंग’मध्ये पहिल्या १०० मध्ये येण्यासाठी विद्यापीठाचा दर्जा वाढणे आवश्यक आहे. यासाठी रिक्त जागा भरल्या गेल्या पाहिजेत.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ