शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फुफ्फुसाचा दुर्मिळ आजार; ११ वर्षाच्या मुलावर विना शस्त्रक्रियेने उपचार

By सुमेध वाघमार | Updated: April 4, 2024 21:27 IST

दोन वर्षांपासून श्वसनाचा त्रास, शरीरही निळे पडत होते

नागपूर : दोन वर्षांपासून ११ वर्षाच्या मुलाला श्वसनाचा त्रास होता. वारंवार शरीरही निळे पडत होते. परंतु आजाराचे निदान होत नव्हते. उपचारासाठी तो अमरावतीहून नागपुरात आला. येथील डॉक्टरांनी त्याचा आजाराचा अभ्यास केला. फुफ्फुसाचा अत्यंत दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी आपले अनुभव व कौशल्याच्या बळावर विना शस्त्रक्रिया उपचार करून मुलाला नवे जीवन दिले.

अमरावती येथील चांदूर रेल्वे येथील ११ वर्षाचा मुलगा अजय (नाव बदलेले आहे) ‘पल्मोनरी आर्टिरिओव्हेनस फिस्टुला’ या  दुर्मिळ आजाराने पिडीत होता. ‘आर्टिरिओव्हेनस फिस्टुला’ म्हणजे धमनी आणि शिरा यांच्यातील एक असामान्य जोडणी होती. शुद्ध व अशुद्ध रक्त मिसळत होते. यामुळे मागील दोन वर्षापासून अजयचे वजन फारच मंद गतीने वाढत होते. श्वास घ्यायला त्रास होत होता. शरीरही वारंवार निळे पडत होते. त्याच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. परंतु आजाराच निदानच होत नव्हते.

-हृदय निकामी होण्याचा धोका होताहृद्य रोग तज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट म्हणाले, शरीर निळे पडणे हे हृद्यात शुद्ध व अशुद्ध रक्त मिसळण्याची लक्षणे आहेत. परंतु विविध हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार सुरू असताना काढलेल्या ‘इको’मध्ये हृद्याची समस्या दिसून येत नव्हती. त्यामुळे वयाच्या ११व्या वर्षीही आजाराचे निदान झाले नव्हते. आमच्याकडे रुग्ण आल्यावर त्याचा लक्षणांचा अभ्यास केला. अखेर सिटी अँजिओग्राफीमध्ये त्याला ‘पल्मोनरी आर्टिरिओव्हेनस फिस्टुला’ हा दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले.  डाव्या फुफ्फुसाच्या धमनीमधून उद्भवलेल्या आणि हृदयाशी विसंगतपणे जोडलेल्या असामान्य वाहिन्यामुळे शुद्ध व अशुद्ध रक्त फुफ्फुसात मिसळत होते. फुफ्फुसाच्या धमन्यांमधून अशुद्ध रक्त थेट हृदयाकडे जाते होते. ज्यामुळे रक्तातील आॅक्सिजनची पातळी कमी व्हायची. यामुळे हृदय निकामी होण्याचा धोका होता. -उपचार आव्हानात्मक होतेया रुग्णावरील उपचार आव्हानात्मक होते, कारण तेथे अनेक आणि मोठे फिस्टुले होते ज्यांना बंद करणे आवश्यक होते. यावर शस्त्रक्रिया केल्यास मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन मृत्यूची भिती होती. यामुळे रुग्णाच्या मांडीच्या वाहिन्यामधून कॅथेटर टाकून तीन डिव्हाईसच्यामदतीने फिस्टुला बंद करण्याचा निर्णय घेतला. यात डॉक्टरांचे अनुभव व कौशल्यामुळे ही उपचार पद्धती यशस्वी झाली, असेही डॉ. हरकुट म्हणाले. या प्रक्रियेत डॉ.मनीष चोखंद्रे, डॉ. योगेश कोळमकर, डॉ. पंकज हरकुट, डॉ. गौरव छाजेड यांचा सहभाग होता. शहरातील हे पहिले प्रकरण आहे. ज्यामध्ये २० किलोच्या मुलामध्ये उपकरणांचा वापर करून तीन मोठी विकृती बंद करण्यात यश आले. सध्या अजयची प्रकृती सुधारत असून त्याला नुकतेच रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती डॉ. चोखंद्रे यांनी दिली.