शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना निदानासाठी रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी टेस्टला हिरवी झेंडी : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 21:02 IST

केंद्र सरकारने कोरोना निदानासाठी रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी बेस्ड ब्लड टेस्ट करण्याला हिरवी झेंडी दाखवली आहे. त्याकरिता पाच लाख किट्स तयार करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देपाच लाख किट्स तयार, राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने कोरोना निदानासाठी रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी बेस्ड ब्लड टेस्ट करण्याला हिरवी झेंडी दाखवली आहे. त्याकरिता पाच लाख किट्स तयार करण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.ही माहिती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. यासंदर्भात सी. एच. शर्मा व सुभाष झंवर यांच्या जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विदर्भामध्ये रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी टेस्टला कधी सुरुवात होईल, अशी विचारणा करून यावर २३ एप्रिलपर्यंत माहिती सादर करण्याचा आदेश दिला. डॉ. अनुप मरार यांनी या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करून डॉ. रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी टेस्टला सुरुवात करण्याची गरज स्पष्ट केली होती. त्यामुळे गेल्या तारखेला न्यायालयाने यासंदर्भात आवश्यक निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, केंद्र सरकारने या टेस्टला हिरवी झेंडी दाखवली. या चाचणीला पीसीआर चाचणीपेक्षा कमी खर्च व वेळ लागतो. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वात या चाचणीचा समावेश आहे.नवीन व्हीआरडीएलसाठी त्रुटी दूर केल्या का?अकोला, यवतमाळ, चंद्रपूर व गोंदिया मेडिकल येथे व्हीआरडीएल (व्हायरल रिसर्च अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) सुरू करण्यासाठी काही त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यावर २३ एप्रिलपर्यंत उत्तर मागितले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने संबंधित त्रुटी काढल्या आहेत. कोरोना निदान तातडीने होण्यासाठी या मेडिकलमध्ये व्हीआरडीएल कार्यान्वित करण्याचा आदेश न्यायालयाने मार्चमध्ये दिला होता हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय