शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारपीडित तरुणीला गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 09:30 IST

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी वैद्यकीय मंडळाचा अहवाल विचारात घेता, बलात्कार पीडित तरुणीला गर्भपात करण्याची परवानगी दिली, तसेच गर्भाच्या डीएनए चाचणीकरिता आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्दे वैद्यकीय अहवाल विचारात घेतला

लोकमत न्यूज नेटवर्क    

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी वैद्यकीय मंडळाचा अहवाल विचारात घेता, बलात्कार पीडित तरुणीला गर्भपात करण्याची परवानगी दिली, तसेच गर्भाच्या डीएनए चाचणीकरिता आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. (Rape victim allowed abortion; High Court )

न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्या न्यायपीठाने पीडित तरुणीला हा दिलासा दिला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे तरुणीचा गर्भपात केला जाणार आहे. न्यायालयाने गेल्या २४ ऑगस्ट रोजी तरुणीच्या तपासणीसाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, सर्व संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करून तरुणीची तपासणी करण्यात आली. मंडळाने तरुणीचा गर्भपात करणे शक्य असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला. पीडित तरुणी १७ वर्षे वयाची असून, तिच्या गर्भात २० आठवड्याचे बाळ आहे. तिने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी याचिका दाखल केली होती. तरुणीच्या वतीने ॲड. आदिल मिर्झा तर, सरकारतर्फे ॲड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.

अनिलकुमार श्रीवास्तववर बलात्काराचा आरोप

२०१५ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर तरुणीच्या आईने मुख्य आरोपी अनिलकुमार श्रीवास्तव याच्यासोबत संबंध जोडले. दरम्यान, श्रीवास्तवने तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. सततचा शारीरिक-मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर मुलीने २५ जून २०२१ रोजी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून श्रीवास्तवसह तीन आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय