शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मैत्रिणीला पळवून नेऊन बलात्कार

By admin | Updated: May 6, 2016 03:11 IST

अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला पळवून नेणाऱ्या बार वेटरला पोलिसांनी अपहरण तसेच बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली.

आरोपी गजाआड : सोनेगावमधील घटना नागपूर : अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला पळवून नेणाऱ्या बार वेटरला पोलिसांनी अपहरण तसेच बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. प्रमोद ऊर्फ निखिल प्रकाश डोंगरे (वय २३) असे आरोपीचे नाव असून, तो कामठी मार्गावरील पिवळी नदी भीमवाडी परिसरात राहतो. खापरीत (सोनेगाव) राहणारी मुलगी १५ वर्षांची आहे. ती दहावीची विद्यार्थिनी असून, आरोपी प्रमोदशी तिची मैत्री आहे. आरोपी सीताबर्डीतील एका बारमध्ये वेटर आहे. सीताबर्डीत येता-जाता ती त्याला भेटायची. खाणे-पिणे आणि फिरणेही व्हायचे. नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास प्रमोदने तिला फोन करून सीताबर्डीत बोलावले. पालक घरी असल्याने आठ वर्षीय आतेभावाला फिरवून आणण्याच्या बहाण्याने मुलगी घराबाहेर पडली. सीताबर्डीत आल्यानंतर तिच्यासोबत छोटा मुलगा पाहून आरोपी प्रमोद तिच्यावर चिडला. घरची सर्व मंडळी हजर असल्याने त्याच्या बहाण्यानेच आपण येथे येऊ शकलो, असे सांगून तिने प्रमोदला शांत केले. त्यानंतर लहान मुलाला घेऊन हे दोघे आरोपीच्या वस्तीत गेले. दरम्यान, रात्र झाली तरी मुलगी आणि तिच्यासोबत असलेला भाचा घरी परतला नसल्याने घाबरलेल्या पालकांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. मंगळवारी दुपारी १२ पासून अल्पवयीन मुलगी तिच्या छोट्या आतेभावासह बेपत्ता असल्याचे कळताच सोनेगाव पोलीस शोधाशोध करू लागले. दरम्यान, बुधवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीने आठ वर्षीय मुलाला खापरी भागात सोडून दिले. त्याने पोलिसांना सांगितलेला घटनाक्रम ऐकून सोनेगावचे ठाणेदार अशोक बागुल यांनी मुलगी तसेच तिच्या मित्राची शोधाशोध सुरू केली.(प्रतिनिधी)मोबाईलवरून मिळाला धागामुलीजवळ मोबाईल होता. तिच्या नंबरवरून कुणाकुणाशी संपर्क झाला, त्याची माहिती घेण्यात आली. त्यात सर्वाधिक कॉल आरोपी प्रमोदचे दिसल्याने त्याचा पत्ता मिळवण्यात आला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी आरोपी आणि मुलीला सीताबर्डीतील सिनेमॅक्सजवळ ताब्यात घेण्यात आले. आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी प्रमोदला अटक केली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवण्यात आला.