शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एनडीआरएफ जवानाने केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:19 IST

नागपूर : एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान झालेल्या मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी एनडीआरएफ जवानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नागपूर : एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान झालेल्या मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी एनडीआरएफ जवानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा वर्षांनंतर युवतीने तक्रार दिल्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत.

रूपेश लक्ष्मण लांडगे (३८) रा.पुणे असे आरोपी एनडीआरएफ जवानाचे नाव आहे. गोंदिया येथील ३२ वर्षांची युवती २०१५ मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. ती नागपूरवरून एसटी बसने गोंदियाला ये-जा करीत होती. याच बसमध्ये रूपेशही ये-जा करीत होता. एसटी स्टँड ते गोंदियापर्यंतच्या प्रवासात दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. रूपेश शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार रूपेशने लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पहिल्यांदा गणेशपेठ ठाण्याच्या परिसरात तिच्याशी शारीरिक संबंध केला. त्यानंतर, रूपेशने अनेक ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध केला. दरम्यान, रूपेशला एनडीआरएफमध्ये शिपाई म्हणून नोकरी लागली. तो पुण्याला निघून गेला. तेथेही युवती भेटण्यासाठी गेल्यानंतर, तो तिच्याशी शारीरिक संबंध करायचा. काही दिवसांपूर्वी रूपेशने दुसऱ्या युवतीसोबत लग्न केले. याबाबत माहिती मिळताच, पीडित युवती रूपेशच्या पुणे येथील घरी गेली. तेथे रूपेशच्या पत्नीसोबत तिचा वाद झाला. रूपेशने लग्न करण्यास नकार देऊन पीडित युवतीला धमकी दिली. पीडित युवतीने गोंदिया पोलिसात तक्रार दिली. गोंदिया पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून, हा गुन्हा गणेशपेठ पोलिसांकडे पाठविला. गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

................